23 November 2017

News Flash

महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार कायद्यातंर्गत पहिला गुन्हा पुण्यात दाखल

पंचायतीने १५ कुटुंबांना समाजातून बहिष्कृत केले होते.

पुणे | Updated: July 17, 2017 11:10 PM

Major fire break out at Kurla : दोन दिवसांपूर्वीच वांद्रे रेल्वे स्थानकाच्या परिसरात असलेल्या झोपडपट्टीलाही भीषण आग लागली होती. गरीबनगर येथील अतिक्रमित झोपडय़ांना नोटीस देऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकाला या झोपडय़ांमधील सिलेंडरच्या स्फोटामुळे ही आग लागली. अनेक तासांच्या प्रयत्नानंतर रात्रीच्या सुमारास ही आग विझवण्यात यश आले.

आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगातदेखील जातीय भेदभावाच्या बुरसट विचारसरणीमुळे काही लोकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. काही दिवसांपूर्वी पुण्याच्या कोंढवा येथे असाच एक प्रकार उघडकीस आला होता. आंतरजातीय विवाह केल्यामुळे येथील तेलगू मडेलवार परीट पंचायतीने १५ कुटुंबांना समाजातून बहिष्कृत केले होते. या प्रकरणी सोमवारी कोंढवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. नव्याने लागू झालेल्या महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार कायद्यातंर्गत हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सामाजिक बहिष्काराच्या कृत्यांना आळा बसावा यासाठी हा कायदा लागू करण्यात आला होता. त्यानुसार कोंढव्यातील कुटुंबांना वाळीत टाकणाऱ्या तेलगू मडेलवार परीट समितीच्या १७ पंचांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा कायदा अस्तित्वात आल्यानंतर त्या अंतर्गत गुन्हा दाखल होण्याची ही पहिलीच वेळ आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा परिसरात तेलगू मडेलवार परीट समाजाचे नागरिक राहतात. त्यापैकी काही तरूणांनी दुसऱ्या जातीतील तरूणींशी विवाह केला. त्यामुळे पंचांनी या कुटुंबीयांना जातीतून बहिष्कृत केले. या प्रकाराबाबत उमेश चंद्रकांत रूद्रापे वय ५१, रा. शिवनेरीनगर, कोंढवा खुर्द यांनी यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पुणे तेलगू मडेलवार समाज फंड संस्थेच्या १७ जणावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. यापूर्वी वाळीत टाकलेल्या कुटुंबियांच्या घरी समाजातील इतर लोकांना कोणत्याही कार्यासाठी जाता येत नसे. तसेच बहिष्कृत कुटंबियांपैकी एखादी व्यक्ती समाजाच्या सार्वजनिक कार्यक्रमाला गेली तर त्याठिकाणी संबंधित व्यक्तीला अपमानास्पद वागणूक दिली जाते असे. या कुटूंबांतील इतरांची लग्न होऊ नये, यासाठी पंचायतीकडून पद्धतशीरपणे प्रयत्न केले जात.

या पार्श्वभूमीवर संबधित बहिष्कृत कुटुंबियांनी स्वत:च्या समाजात अनेक ठिकाणी दाद मागून पाहिली. मात्र, कोणीही त्यांची दखल न घेतल्यामुळे अखेर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी आज महाराष्ट्र सामाजिक बहिष्कारापासून व्यक्तीचे संरक्षण अधिनियम २०१६ या कायद्यानुसार १७ जणांवर गुन्हा दाखल केला. पुणे तेलगू मडेलवार समाज फंड संस्थेचे अध्यक्ष अध्यक्ष राजेंद्र नसूर म्हाकाळे, उपाध्यक्ष सुनिल दत्तू कोंडगिर, सचिव अनिल वरगंटे, सहसचिव श्रीधर बेलगुडे, सुरेश गुंडाळकर, खजिनदार सुनील वरगडे,  सहखजिनदार देवीदास वरगडे, मुख्य संघटक शिवान्ना आरमुर, सह संघटक वसंत वरगडे, लक्षीमन बेलगुडे,  संजय येलपुरे, तुळशीराम तेलाकल्लू, प्रेमचंद्र वडपेल्ली, नारायण इस्टोलकर, महिला प्रतिनिधी मनिषा मनिषा आसरकर, स्वरूपा अंबेप यांच्या गुन्हा दाखल झालेल्या आरोपींमध्ये समावेश आहे.

First Published on July 17, 2017 11:10 pm

Web Title: first fri filed under new law against social ban on families in pune