मेट्रो चाचणीनंतर राजकीय श्रेयवादाची लढाई

पुणे : मेट्रो कोणामुळे रखडली, यावरून आतापर्यंत एकमेकांवर चिखलफे क करणाऱ्या राजकीय पक्षांनी चाचणी यशस्वी झाल्यानंतर राजकीय श्रेयवादाची लढाई सुरू के ली आहे. पुणेकरांना दिलेल्या आश्वासनाची भाजपने पूर्तता के ली आहे, असा दावा भाजपने के ला आहे. अजित पवार यांच्या बळावरच मेट्रो रुळावर आल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसकडून सांगितले जात आहे, तर काँग्रेसच्या सत्ताकाळात मेट्रो प्रकल्पाला गती मिळाली, असा दावा काँग्रेसने के ला आहे.

वनाज ते आयडियल कॉलनी या टप्प्यातील मेट्रोची चाचणी शुक्रवारी घेण्यात आली. सन २००७ मध्ये महापालिके ने मेट्रोच्या प्रस्तावाला मान्यता दिली. त्यानंतर प्रत्येक टप्प्यावर मेट्रोचा प्रवास अडकला. मेट्रोचा प्रस्ताव मान्य करणारी पुणे ही देशातील पहिली महापालिका ठरली होती. मात्र राजकीय वादातून हा प्रस्ताव पुढे सरकू  शकला नाही. चार वर्षांपूर्वी पुण्यातील मेट्रोचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत भूमिपूजन झाले आणि त्यानंतर पुढील तीन वर्षांत मेट्रोचे काम पुणेकरांना प्रत्यक्ष दिसले. तीन वर्षांत मेट्रोचे ६० टक्के  काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे मेट्रोच्या कामाला आपल्याच सत्ताकाळात आणि आपल्याच नेत्यांमुळे गती मिळाली, असा दावा राजकीय पक्षांकडून सुरू झाला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी पुण्याबरोबरच राज्यातील अन्य मेट्रो प्रकल्पांना गती दिली. निवडणुकीपूर्वी मेट्रो प्रवासाचे आश्वासन भाजपने दिले होते. त्याची पूर्तता झाली आहे, असा दावा भाजप पदाधिकाऱ्यांनी के ला आहे. आमदार चंद्रकांत पाटील यांनीही दूरसंवाद चित्रफितीद्वारे संवाद साधताना फडणवीस यांना मेट्रोचे श्रेय दिले.

दरम्यान, अजित पवार यांच्या बळामुळेच मेट्रोला गती मिळाली आहे. भाजपच्या वाचाळवीरांनी फु कटचे श्रेय घेऊ नये. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकाळातच मेट्रोचा प्रस्ताव मंजूर झाला. शरद पवार यांनी के ंद्राकडून हा विषय मंजूर करून घेतला. राज्यात भाजपचे सरकार आल्यानंतर राजकारण करून मान्य प्रस्ताव रखडविण्यात आला, अशी टीका राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी के ली. मेट्रोची चाचणी यशस्वी झाली ही काँग्रेसची स्वप्नपूर्ती आहे, असा दावा मोहन जोशी यांनी

के ला. राज्यातील, केंद्रातील काँग्रेस नेत्यांनी सातत्याने त्यासाठी पाठपुरावा के ला. काँग्रेसने मेट्रोचा ठराव महापालिके त मंजूर करून घेतला. मेट्रोची परवानगी आणि अन्य किचकट प्रक्रिया काँग्रेसच्या सत्ताकाळात पूर्ण करण्यात आल्या. पृथ्वीराज चव्हाण यांनी त्याला गती दिली, असे जोशी यांनी स्पष्ट केले.