01 March 2021

News Flash

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीत पाच जणांचा मृत्यू

चौकशी सुरु

पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटच्या आगीत पाच जणांचा मृत्यू झाला आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी प्रसारमाध्यांशी बोलताना ही माहिती दिली आहे. मृत्यू झालेले बांधकाम मजूर असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. “आग लागलेल्या ठिकाणी कोव्हिशिल्ड लसीचं उत्पादन किंवा साठवणूक होत नव्हती. पूर्णपणे दुसऱ्या ठिकाणी हे काम सुरु होतं. पण दुर्दैवाने पाच जणांना जीव गमवावा लागला असल्याचं,” मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं आहे.

सीरम इन्सिट्यूटच्या आगीमागे घातपात? उद्धव ठाकरेंनी दिलं उत्तर; म्हणाले…

“सुरुवातीला चार लोक अडकल्याची माहिती मिळाली होती. पुणे महापालिका आणि अग्निशमन दलाने त्यांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. आग १०० टक्के विझल्यानंतर आपली लोकं शेवटच्या मजल्यावर पोहोचली तेव्हा मजला खाक झाला होता आणि पाच जणांचे मृतदेह पडले होते. पाचही जणांचा आगीत होरपळून मृत्यू झाला,” असं मुरलीधर मोहोळ यांनी सांगितलं.

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीदेखील यासंबंधी माहिती दिली आहे. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले की, “जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांच्यासोबत मी चर्चा केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वेल्डिंगचं काम सुरु असताना दुपारी २ वाजता आग लागली. वेल्डिंगचं निमित्त होतं मात्र तेथील ज्वलनशील सामानामुळे आग मोठ्या प्रमाणात भडकली. महापालिकेचे पाच टँकर आणि तीन पाण्याचे टँकर तात्काळ बोलावण्यात आले होते. संपूर्ण आग विझवण्यात आली असून दोन ते तीन तास लागले. संपूर्ण आग विझली असून सर्व काही नियंत्रणात आहे”.

पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये भीषण आग
पुण्याची सीरम इन्स्टिट्यूट आगीच्या तडाख्यात

“आग विझल्यानंतर आत जाऊन पाहिलं असता पाच मृतदेह सापडले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी मला ही माहिती दिली,” असं राजेश टोपे यांनी सांगितलं. राजेश टोपे यांनी यावेळी कोव्हिशिल्ड लसीला कोणताही फटका बसला नसल्याचं यावेळी सांगितलं. दरम्यान याप्रकरणी पोलीस चौकशी करत असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. पोलीस तपासासोबत फायर ऑडिटही केलं जाईल असं त्यांनी सांगितलं.

मृतांची नावे-
प्रतिक पाष्टे – डेक्कन पुणे
महेंद्र इंगळे – पुणे
रमाशंकर हरिजन – उत्तर प्रदेश
बिपीन सरोज – उत्तर प्रदेश.
सुशीलकुमार पांडे – बिहार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2021 5:53 pm

Web Title: five death in serum institue fire in pune svk 88 sgy 87
Next Stories
1 “या आगीत काही मजले जळून खाक झाले असले तरी…”; ‘सीरम’ला लागलेल्या आगीवर पूनावाला यांची पहिली प्रतिक्रिया
2 सीरम इन्स्टिट्यूटमधील आगीसंदर्भात पोलीस आयुक्त अमिताभ गुप्तांनी दिली माहिती, म्हणाले…
3 सीरम इन्स्टिट्यूटला लागलेली आग आटोक्यात
Just Now!
X