खड्डय़ांमुळे गंभीर अपघात; रस्ते दुरुस्तीच्या नावाखाली तात्पुरती मलमपट्टी

हडपसर ते सासवड रस्ता वाहनचालकांसाठी धोकादायक झाला आहे. या रस्त्यावरील जड वाहनांची वाहतूक, तसेच ठिकठिकाणी पडलेल्या खड्डय़ांमुळे दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत. गेल्या २५ दिवसांत या रस्त्यावर झालेल्या अपघातात पाच जणांचे बळी गेले आहेत. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला जाग आली असून, खड्डे बुजवण्यासाठी तात्पुरती मलमपट्टी करण्यात आली आहे.

mumbai, Santacruz Chembur Expressway Widening, Amar Mahal Santacruz Elevated Road, Completion Pushed to July, delay in bridge construction, santacruz bridge construction, santacruz chembur road, mumbai road, mumbai bridge
अतिवेगवान प्रवासासाठी जुलैपर्यंत प्रतीक्षा, सांताक्रूझ चेंबूर जोडरस्ता विस्तारीकरण प्रकल्प लांबणीवर
Chalisgaon, railway trains canceled,
चाळीसगावमधील कामामुळे तीन दिवस काही रेल्वे गाड्या रद्द
Mumbai Coastal Road, bmc, 2 Lakh Vehicles, Worli Marine Drive, travel, South Channel, 12 Days,
सागरी किनारा मार्गावर १२ दिवसांत सव्वादोन लाखांहून अधिक वाहनांची ये-जा
Best Selling Bike
‘या’ बाईकने TVS Raider, Pulsar, Apache सह सर्वांचा केला खेळ खल्लास? २९ दिवसात २ लाख ७७ हजाराहून अधिक लोकांनी केली खरेदी

गेल्या काही वर्षांत हडपसर भागाचा मोठय़ा प्रमाणावर विस्तार झाला असून नोकरी-व्यवसायानिमित्त परगावातील अनेक जण या परिसरात स्थिरावले आहेत. हडपसर-सासवड रस्त्यावर आयबीएम आयटी पार्क, अनेक बँका, शाळा, महाविद्यालये आहेत. पंढरपूर, फलटण, सांगोला येथे जाणाऱ्या एसटी बस या रस्त्याचा वापर करतात, तसेच मंतरवाडी भागात अनेक कंपन्यांची गोदामे आहेत. त्यामुळे या रस्त्यावरच जड वाहनांची वाहतूक मोठय़ा प्रमाणावर आहे. जड वाहनांमुळे या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. सत्यमपूरम सोसायटी ते मंतरवाडी चौकापर्यंत रस्त्याची चाळण झाली आहे. गेल्या पंचवीस दिवसांत या भागात पडलेल्या खड्डय़ांमुळे पाच जणांचे बळी गेले आहेत. रेल्वे उड्डाणपुलाचे कठडे तुटलेले आहेत.

मुलीच्या विवाहाची निमंत्रणपत्रिका नातेवाइकांना देऊन परतणाऱ्या दुचाकीस्वार दाम्पत्याचा मृत्यू झाल्याची घटना या रस्त्यावर काही दिवसांपूर्वी घडली होती. खड्डे चुकवताना दुचाकी घसरल्याने दाम्पत्य ट्रकखाली येऊन मृत्युमुखी पडले होते. लागोपाठ झालेल्या अपघातांमुळे प्रशासनाला जाग आली असून तेथे खड्डे बुजवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. पावसाळय़ात पडलेले खड्डे बुजवण्यासाठी त्यात खडी ओतली आहे, मात्र खड्डय़ात ओतलेली खडी बाहेर आल्याने दुचाकी घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे.

गेल्या पंचवीस दिवसांत हडपसर रस्त्यावर झालेल्या अपघातांमुळे पाच जणांचे बळी गेले आहेत. हा रस्ता पूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत होता. काही महिन्यांपूर्वी हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे गेला आहे. सत्यमपूरम सोसायटी ते मंतरवाडी दरम्यान रस्त्याची चाळण झाली असून, खड्डे बुजवण्यासंदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला निवेदन देण्यात आले आहे. खड्डय़ांत खडी ओतली आहे. खडी बाहेर आल्याने पुन्हा दुचाकी घसरून अपघात होण्याचे प्रमाण वाढले आहे. या रस्त्याकडे शासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष झाले आहे. आणखी किती बळी या रस्त्यावर जाणार आहेत, असा सवाल या भागातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

रोहिणी दत्ता राऊत, पंचायत समिती सदस्य, फुरसुंगी

हडपसर ते सासवड रस्त्यावर पडलेल्या खड्डय़ांमुळे वाहनचालकांना विशेषत: दुचाकीस्वारांना जीव मुठीत घेऊन जावे लागते. दररोज सकाळी आणि सायंकाळी या रस्त्यावर मोठय़ा प्रमाणावर गर्दी असते. मुले शाळेतून घरी येईपर्यंत पालकांना काळजी वाटते, एवढी या रस्त्यावरची वाहतूक धोकादायक झाली आहे. रस्त्याच्या दुतर्फा अतिक्रमणे वाढली आहेत. खाद्यपदार्थाच्या टपऱ्या लावणाऱ्या विक्रेत्यांकडून रस्त्यावर पाणी ओतले जाते. या भागात धुळीचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना श्वसनविकाराने ग्रासले आहे. पुण्यातील कचरा उरुळी देवाची येथे कचरा डेपोत नेला जातो. या भागातून मोठय़ा संख्येने जड वाहने जातात. 

– जयप्रकाश वाघमारे , स्थानिक रहिवासी