पिंपरी-चिंचवड शहरात आज सहा जण करोना विषाणू बाधित असल्याच समोर आलं आहे. दरम्यान, शहरातील परिस्थिती सावरत असताना अचानक ही संख्या वाढली आहे. त्यामुळे शहरातील करोना बाधितांचा आकडा हा २१ वर पोहचला असून त्यांच्यावर एका खासगी आणि महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पिंपरी-चिंचवड शहरातील अगोदर च्या ऐकून १२ जणांना डिस्चार्ज करून घरी पाठवण्यात आले आहे. तर तीनजण हे दिल्लीत झालेल्या धार्मिक कार्यक्रमातून शहरात परतले होते. त्यांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर आज सहा जणांचा करोना पॉझिटिव्ह अहवाल आला असून शहर करोनामुक्त च्या दिशेने वाटचाल करत असताना हा आकडा वाढला आहे. त्यामुळे परिस्थिती गंभीर झाली आहे. शहरात ऐकून आकडेवारी ही २१ वर पोहचली असून त्यातील १२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आठ जणांवर महानगर पालिकेच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.