12 August 2020

News Flash

पुण्यातील येरवडा कारागृहातील पाच कैदी फरार

इमारतीच्या खिडकीचा गज कापून मध्यरात्रीच्या सुमारास केले पलायन

संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र

करोना वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्‍वभूमीवर पुण्यातील येरवडा कारागृहातील काही कैदी शासनाच्या आदेशानुसार  तात्पुरत्या इमारतीमध्ये हलवण्यात आले आहेत.  यामधील ‘मोक्का’च्या गुन्ह्यातील पाच कैदी आज फरार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

अजिंक्य कांबळे, उत्तम कांबळे,सनी पिंटो, देवगण चव्हाण आणि अजिनाथ चव्हाण अशी फरार झालेल्या कैद्यांची नावं आहेत.

पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा कारागृहातील काही कैद्यांना करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर तात्पुरत्या इमारतीमध्ये  हलवण्यात आले होते. यातील अजिंक्य कांबळे, उत्तम कांबळे,सनी पिंटो, देवगण चव्हाण आणि अजिनाथ चव्हाण हे पाच आरोपी मोक्याच्या गुन्ह्यातील आहेत.  हे पाच जण इमारतीच्या खिडकीचा गज कापून मध्यरात्रीच्या सुमारास पळून गेले आहेत. ही घटना काही वेळेतच लक्षात येताच आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली असून, या पाचही जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे येरवडा पोलिसानी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 16, 2020 10:43 am

Web Title: five prisoners escape from yerawada jail in pune msr 87 svk 88
Next Stories
1 सरासरी वीज देयकांची डोकेदुखी टळली
2 अडचणींशी सामना करत पिंपरीतील उद्योग सुरू
3 टाळेबंदीत पतंगबाजांचा उच्छाद
Just Now!
X