पुणे : कोकणासह कोल्हापूर, सांगली भागात आलेल्या पुरामुळे आणि जिल्ह्य़ातील घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जिल्हा प्रशासनाने संभाव्य आपत्ती टाळण्यासाठी शहरासह जिल्ह्य़ातील पूरप्रवण भागांची यादी जाहीर के ली आहे. त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांनी संबंधित पूरप्रवण गावांमध्ये आवश्यक उपाययोजना करण्याचे आणि पावसाचे प्रमाण वाढल्यास संबंधित नागरिकांचे स्थलांतर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

जिल्ह्य़ाच्या घाटमाथ्यावर आणि धरणांच्या परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे पूरप्रवण भाग आणि गावांमधील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या पाश्र्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने शहरासह जिल्ह्य़ातील पूरप्रवण भाग आणि गावांची यादी जाहीर के ली आहे.

त्यानुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील हिंगणे खुर्द, विठ्ठलवाडी, पुलाची वाडी, पाटील इस्टेट, येरवडय़ातील शांतीनगर आणि इंदिरानगर, संगमवाडी, लोणी काळभोर, चांदे, वाकड, औंध, दापोडी, सांगवी, बाणेर, हिंगणगाव, पिंपरी, चिंचवड, कासारवाडी, फु गेवाडी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, रहाटणी, चोवीसवाडी, निरगुडे आणि सांगवी या भागांचा समावेश आहे. तसेच ग्रामीण भागात दौंड तालुक्यातील सर्वाधिक १६ गावे आहेत. त्यानंतर मावळातील दहा, आंबेगाव आणि शिरूरमधील प्रत्येकी नऊ, मुळशीतील सात, भोरमधील तीन गावांचा समावेश आहे. इंदापूर, बारामती, खेड या तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक, तर जुन्नरमधील दोन गावे आहेत.

या गावांवर विशेष लक्ष ठेवावे, तसेच पावसाचे प्रमाण वाढत असल्याने आपत्ती व्यवस्थापनाशी निगडित संबंधित अधिकाऱ्यांनी मुख्यालयात थांबावे, असे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

जिल्ह्य़ातील प्रमुख पूरप्रवण गावे

भोर – पऱ्हाटी, लुमेवाडी आणि निरा, खेड – सांगुर्डी, आंबेगाव – चांडोली, पारगाव, निगुडसर, नारोडी, चिंचोली, जवळे, पडवळ, गणेगाव दुमाला, बाभुळसर आणि तांदळी, जुन्नर – साखरगाव आणि नारायणगाव, हवेली – पिंपरी सांडस, डोंगरगाव, बुर्के गाव, पेरणे, आष्टापूर, न्हावीसांडस आणि वढू खुर्द, शिरूर – शिक्रापूर, कोरेगाव भीमा, डिग्रजवाडी, विठ्ठलवाडी, वडगाव रासाई, वढू बुद्रुक, आपटी, रांजणगाव, सांडस आणि म्हाळुंगे, दौंड – नांदूर, वडगाव, काशिंबे, गोनवडी, खोरवडी, वडगावढेरे, पेडगाव, सोनवडी, मलठण, बावडा, गणेशवस्ती, भांडगाव हातवळण, हिंगणेबेरडी आणि शिरापूर, इंदापूर – निरा नरसिंगपूर, मावळ – भावडी, पुलगाव, सांगवी सांडस, लोणावळा, कामशेत आणि वडगाव मावळ ; तसेच देहू आणि आळंदी यांचा समावेश आहे.