मुरली, वेणू, पावा ही भगवान श्रीकृष्णाचे वाद्य अशी ओळख असलेल्या बासरीची विविध नावे. पं. पन्नालाल घोष आणि पं. हरिप्रसाद चौरासिया यांनी शास्त्रीय संगीताच्या स्वरमंचावर प्रतिष्ठा मिळवून दिली.14basari बासरी या वाद्याच्या प्रचार आणि प्रसाराबरोबरच वादनासाठी बासरीमध्ये वेगवेगळे संशोधनात्मक प्रयोग पं. केशव गिंडे यांनी केले आहेत. त्यांनी निर्मिलेल्या ‘केशव वेणू’ची लिम्का आणि गिनिज बुकमध्ये नोंद झाली आहे.
पं. पन्नालाल घोष यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पं. केशव गिंडे यांनी बासरी या वाद्यासाठी कार्यरत असलेल्या ‘अमूल्यज्योती’ संस्थेची स्थापना केली. या संस्थेचा रौप्यमहोत्सवी ‘वेणूघोष समारोह’ शुक्रवारपासून (१७ ऑक्टोबर) दोन दिवस रंगणार आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे ललित कला केंद्र गुरुकुल यांच्या संयुक्त विद्यमाने गरवारे महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये शुक्रवारी सायंकाळी साडेपाच वाजता या समारोहाचे उद्घाटन होणार आहे. ज्येष्ठ संगणकतज्ज्ञ डॉ. विजय भटकर, सिम्बायोसिसचे संस्थापक डॉ. शां. ब. मुजुमदार, तालयोगी पं. सुरेश तळवलकर, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. अनिल अवचट आणि ललित कला केंद्राच्या प्रमुख डॉ. शुभांगी बहुलीकर या वेळी उपस्थित राहणार आहेत. दिल्ली येथील प्रसिद्ध बासरीवादक पं. राजेंद्र प्रसन्ना यांना पं. पन्नालाल घोष वेणू-रत्न पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या महोत्सवात शुक्रवारी पं. राजन कुलकर्णी यांचे सरोद वादन आणि पं. राजेंद्र प्रसन्ना यांचे बासरीवादन होणार आहे. तर, शनिवारी (१८ ऑक्टोबर) पं. केशव गिंडे आणि शिष्यवर्गाचे बासरीवादन व आदित्य खांडवे आणि राजेंद्र कंदलगावकर यांचे गायन होणार आहे. याच कार्यक्रमात पं. केशव गिंडे अमूल्यज्योती बासरीवादन शिष्यवृत्ती आणि अमर गोगटे तबला शिष्यवृत्ती प्रदान केली जाणार आहे.

byju raveendran raised debt to pay march salaries of employees
बैजूजकडून कर्मचाऱ्यांच्या मार्चच्या वेतनाची कर्ज काढून पूर्तता
vidarbh economic development marathi news loksatt
तांदळाच्या प्रजातींवर संशोधन संस्थेसाठी ‘वेद’ आग्रही
Wardha Lok Sabha, Amar Kale,
वर्धा : “कुणी घर देता कां घर…”, अमर काळे यांची शोधाशोध; कार्यालयासाठी…
in Gadchiroli charmoshi taluka s Villagers Oppose Land Acquisition for Iron Project BJP Faces Backlash in Lok Sabha Campaign
भूसंपादनावरून संतप्त ग्रामस्थांकडून भाजपचे ‘बॅनर’ लावण्यास मनाई , प्रचारासाठी गेलेल्या कार्यकर्ते व नेत्यांनाही परत पाठवले