News Flash

“राहुल गांधींनी पक्षातल्या वरिष्ठांची चर्चा करावी मग केंद्रावर आरोप करावेत”

राहुल गांधी यांनी जी टीका केली त्याची निर्मला सीतारामन यांनी खिल्ली उडवली आहे

राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर आरोप करण्याआधी पक्षातल्या वरिष्ठांसोबत चर्चा करावी त्यानंतर केंद्र सरकारवर आरोप करावेत असा टोला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी लगावला आहे. आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या गंगाजळीतली वरकड रक्कम केंद्र सरकारला हस्तांतरित करण्याचा निर्णय सोमवारी घेण्यात आला. हा निर्णय आरबीआयकडून चोरी करण्यासारखाच आहे अशी टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली. ज्या टीकेला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उत्तर दिलं.

राहुल गांधी हे जेव्हा चोर, चोरी असे मुद्दे बाहेर काढून केंद्र सरकारवर निशाणा साधतात तेव्हा एक गोष्ट माझ्या मनात येते की ते चोर, चोरी या मुद्द्यावरुन जोरकसपणे आरोप करतात. त्यानंतर देशाची जनताच त्यांना त्यांच्या आरोपांचं चोख प्रत्युत्तर देते. पराभवाची धूळ जनतेने राहुल गांधी यांना चारली तरीही त्यांची आरोप करण्याची हौस फिटलेली नाही असं म्हणत निर्मला सीतारामन राहुल गांधी यांना टोला लगावला. पुण्यात पत्रकारांशी बोलताना त्यांनी राहुल गांधी यांच्या आरोपांची खिल्ली उडवली.

यावेळी त्यांनी देशातल्या उद्योगांबाबतही भूमिका मांडली. देशात छोट्या, मोठ्या, मायक्रो, मिनि प्रकारचे उद्योजक असतील तरी सगळ्यांना सोबत घेऊन जाणं ही आमची भूमिका आहे असंही निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर सगळ्यांना त्यांचा व्यवसाय कोणतीही अडचण न येता कसा सुरु ठेवता येईल यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करतो आहोत असंही त्यांनी स्पष्ट केलं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2019 6:10 pm

Web Title: fm nirmala sitharaman gave answer to rahul gandhi on rbi scj 81
Next Stories
1 भाजपा नेते स्वामी चिन्मयानंद यांच्यावर लैंगिक अत्याचाराचा आरोप करणारी विद्यार्थीनी बेपत्ता
2 ”काश्मीर तर सोडाच आता मुजफ्फराबाद कसे वाचवायचे ते पहा”
3 अ‍ॅमेझॉनच्या जंगलातील वणवा विझवण्यासाठी सरसावला कोकणी माणूस, ब्राझीलला दिला हा इशारा
Just Now!
X