News Flash

वनीकरणाच्या कामात जनसहभाग आवश्यक – डॉ. अनिलकुमार झा

पर्यावरण, वृक्षारोपण व वनसंवर्धन क्षेत्रातील विविध उपक्रम लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागातर्फे ‘सह्य़ाद्री जनवनवार्ता’ या त्रमासिकाच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन झाले.

| August 19, 2015 03:13 am

वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धन या कामात जनसहभाग आवश्यक असून यासाठी सामाजिक वनीकरण विभाग स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने पुढाकार घेणार आहे, अशी माहिती सामाजिक वनीकरण विभागाचे प्रधान मुख्य वनसंरक्षक व उपमहासंचालक डॉ. अनिलकुमार झा यांनी दिली. पर्यावरण, वृक्षारोपण व वनसंवर्धन क्षेत्रातील विविध उपक्रम लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी सामाजिक वनीकरण विभागातर्फे ‘सह्य़ाद्री जनवनवार्ता’ या त्रैमासिकाच्या पहिल्या अंकाचे प्रकाशन त्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते.
विविध राष्ट्रीय, धार्मिक व पर्यावरण विषयक दिनाच्या निमित्ताने उपक्रमांची माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सह्य़ाद्री जनवनवार्ता हे त्रमासिक वनीकरण विभागाच्या कर्मचाऱ्यांना उपयुक्त ठरणार आहे, असे सरफराज खान यांनी सांगितले. कार्यक्रमात मुख्य वनसंरक्षक सरफराज खान, ‘बायोस्फियर्स’ चे डॉ. सचिन पुणेकर, नानासाहेब लडकत हरित मित्र परिवाराचे संघटक महेंद्र घागरे, सहायक जनसंपर्क अधिकारी सुनील खरात, सहायक संचालक व्ही.व्ही. कुलकर्णी आदी उपस्थित होते. या वेळी हळद, उंडल, कारंबळ, अर्जुन, बेल अशा २८ प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात आली. पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्य़ांत राबविण्यात येणाऱ्या वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन, पर्यावरण जागृती या संबंधीच्या कार्यक्रमांबद्दल माहिती या वेळी देण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 19, 2015 3:13 am

Web Title: forestry sahyadri janvanvarta initiative
टॅग : Initiative
Next Stories
1 अर्जदार म्हणजे ग्राहक नव्हे! – ग्राहक मंचाचा निर्वाळा
2 महाराष्ट्रात ‘एमएसडी’ उभारण्याचा नाटय़परिषदेचा संकल्प हवेतच?
3 एफटीआयआयचे पाच विद्यार्थी अटकेत
Just Now!
X