24 February 2021

News Flash

मुंबई मेट्रो : चर्चेला आमची तयारी, चर्चेतून मार्गही निघतो – देवेंद्र फडणवीस

केंद्रानं, राज्यानं एकत्रित प्रश्न सोडवण्याची आवश्यकता असल्याचं म्हणाले होते मुख्यमंत्री

“मेट्रो प्रकल्पात राज्य सरकारइतकाच निधी केंद्र सरकारचा सुद्धा आहे. केंद्राच्या मदतीने जायका या प्रकल्पाला वित्तपुरवठा केला आहे. मुंबईकरांच्या हितासाठी केंद्र सरकारने यापूर्वीसुद्धा महाराष्ट्राला सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. यापुढे सुद्धा सहकार्याचीच भूमिका केंद्र सरकारची असणार आहे. तसेच मेट्रो वरून श्रेय घ्यायचे तर घ्या पण मुंबईकराना सेवा मिळाला पाहिजे. तसेच आरेच्या जागेला सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. आरेची जागा अंतिम झाल्यानंतर काम सुद्धा बरेच पुढे गेले आणि १०० कोटी रुपयांचा खर्चही झाला. लोकशाहीत चर्चेला आमची कायमच तयारी आहे आणि चर्चेतून मार्गही निघतो,” असं मत माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं.

भाजप माळशिरस विधानसभा मतदार संघाचे आमदार राम सातपुते यांच्या लग्न समारंभाला माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, आमदार नितेश राणे, प्रशांत परिचारक यांच्यासह विविध क्षेत्रातील मंडळीनी हजेरी लावली होती. त्यापूर्वी फडणवीसांनी आपली प्रतिक्रिया दिली.

“जर मनात शंका असेल तर आज आरे कारशेडला जी जागा दिली. त्यापेक्षा एक इंचही जास्त जागा भविष्यात दिली जाणार नाही असा निर्णय करा. आम्ही त्याला पाठिंबा देऊ. आमची एकच विनंती आहे की आता दुराग्रह सोडून द्यावा आणि मुंबईकरांच्या हितासाठी आरेच्या जागेवर कारशेडचा मार्ग तत्काळ प्रशस्त करावा. राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मेट्रोबाबत अहवाल वाचावा. शरद पवार यांच्याशी आमचे कितीही मतभेद असले तरी ते हा अहवाल वाचतील आणि प्रॅक्टिकल निर्णय घेतील. तसेच ते कधीही चुकीचा निर्णय घेणार नाहीत,” असंही ते म्हणाले.

काय म्हणाले होते मुख्यमंत्री ?

“आरे कारशेड मेट्रो ३ साठी करत होतो. त्या ठिकाणी ३० हेक्टर जागा प्रस्तावित होती. त्यापैकी ५ हेक्टर जागेमध्ये घनदाट जंगल होतं. उर्वरित २५ हेक्टर जागा ही आपल्याला कमी पडणार होती. त्यानंतर आपल्याला जंगल मारत मारत ही जागा कमी वाढवावी लागली असती. म्हणून त्या ठिकाणी कांजूरमार्गच्या जागेचा प्रस्ताव ठेवण्यात आला होता,” असं मुख्यमंत्री म्हणाले. “मेट्रोसाठी आपल्याला स्टेंबलिंग लाईनची आपल्याला आवश्यकता आहे. पहिल्या प्रकल्पात स्टेंबलिंग लाईनचा प्रस्ताव नव्हता हे पाहून मला धक्का बसला. आरेमध्ये आपण पर्यावरण वाचवलं. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाची व्याप्तीही आपण वाढवली. कांजूरमार्गला आपल्याला ४० हेक्टर जागा मिळली होती. काजूरमार्गची जागा ओसाड आहे. कांजूरमार्गला मेट्रोच्या ३,४ आणि ६ या मार्गिकेंच्या कारशेड करता येणार होणार होत्या. यात एक मोठा फरक आहे. जिकडे एका मार्गिकेसाठी कारशेड होणार होती तिकडे अन्य लाईनसाठीही कारशेड करता येणार आहे. केवळ एका लाईनसाठी आरेमध्ये प्रकल्प कशासाठी?,” असा सवालही त्यांनी यावेळी केला.

“आरेमध्ये केल्यास त्याचा वापर केवळ पुढच्या पाच वर्षांसाठी होणार होता. परंतु काजूरमध्ये केल्यास त्याचा वापर पुढच्या ४० वर्षांसाठी करता येईल. कांजूरमधून आपल्याला थेट अंबरनाथ, बदलापूरपर्यंत मेट्रो नेता येणार आहे. आपल्या विरोधात केंद्र न्यायालयात गेलं. केंद्रानं आणि राज्यानं एकत्रित बसून वाद सोडवणं आवश्यक आहे. विरोधकांनीही हा प्रश्न सोडवावा. मी तुम्हाला त्याचं श्रेयही द्यायला तयार आहे. हा जनतेच्या हिताचा प्रश्न आहे,” असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 20, 2020 7:29 pm

Web Title: former cm devendra fadnavis speaks on mumbai metro cm uddhav thackeray maharashtra svk 88 jud 87
Next Stories
1 मुंबई महापालिका काँग्रेसने स्वबळावर लढावी, अध्यक्ष भाई जगताप यांचा स्वबळाचा नारा
2 शिवसेनेसारखी कामं करायची नाहीत; चंद्रकांत पाटालांचा भाजपा नगरसेवकांना सल्ला
3 थंडीच्या वाटेत नवे विघ्न..
Just Now!
X