25 February 2021

News Flash

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला

हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी झआली आहे अटक

माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला आहे. आता या प्रकरणी पुन्हा एकदा सोमवारी पुणे जिल्हा सत्र न्यायालयात बचाव पक्षातून अर्ज केला जाणार आहे.

भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना १५ डिसेंबरला पुण्यात अटक करण्यात आली आहे. चतुःशृंगी पोलिस ठाण्यात त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हत्येचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली हर्षवर्धन जाधव आणि अजून एका महिलेविरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. हर्षवर्धन जाधव आणि इशा झा या दोघांविरोधात अमन चड्डा यांनी फिर्याद दिली होती. आता न्यायालयाने या प्रकरणात हर्षवर्धन जाधव यांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार अमन चड्डा सोमवारी सकाळच्या सुमारास आई, वडिलांना दुचाकीवरून ब्रेमन चौकाकडे घेऊन जात होते. याचवेळी हर्षवर्धन जाधव आणि इशा झा हे रस्त्याच्या बाजूला एका चारचाकीमध्ये बसले होते. कारचा दरवाजा उघडल्याने चड्डा यांच्या दुचाकीचा अपघात झाला. यानंतर चड्डा यांनी चार चाकीमध्ये बसलेल्या हर्षवर्धन जाधव आणि ईशा यांना जाब विचारला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2020 3:33 pm

Web Title: former mla harshvardhan jadhav bail application rejected by court scj 81 svk 88
Next Stories
1 ‘एमपीएससी’ तांत्रिक सेवा परीक्षा पद्धतीमध्ये बदल
2 पुण्यात दिवसभरात २९८ नवे करोना रुग्ण, पिंपरीत १२२ नवे रुग्ण
3 पुण्यात कॉम्प्युटर इंजिनिअरला इन्कमटॅक्स कारवाईची भीती दाखवून ११ लाखांची फसवणूक
Just Now!
X