माजी केंद्रीय मंत्री, भाजपा नेते आणि प्रसिद्ध पत्रकार अरुण शौरी यांना काल रात्री अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात आले आहे. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टर त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेऊन आहेत.
Medical Director, Ruby Hall Clinic, Pune: Arun Shourie is stable now and under observation at the hospital. #Maharashtra https://t.co/HORY9zVwfN
— ANI (@ANI) December 2, 2019
७८ वर्षीय शौरी यांना रविवारी रात्री अचानक अस्वस्थ वाटू लागले आणि ते बेशुद्ध झाले त्यानंतर त्यांना तातडीने रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले. दरम्यान, त्यांच्या प्रकृतीची माहिती देताना रुग्णालयाचे वरिष्ठ डॉक्टर म्हणाले, “त्यांच्या आवश्यक सर्व वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे. तसेच त्यांना वैद्यकीय निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on December 2, 2019 11:06 am