‘वनाझ इंजिनिअर्स’चे संस्थापक आणि माजी व्यवस्थापकीय संचालक संभाजी कैलाशचंद्र ऊर्फ एस. के. खांडेकर (वय ९३) यांचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुलगे आणि दोन मुली असा परिवार आहे. वनाझचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद खांडेकर हे त्यांचे चिरंजीव होत.
वनाझ कंपनीची स्थापना करणाऱ्या खांडेकर यांनी खऱ्या अर्थाने विश्वस्त म्हणून काम करताना कारखान्यातील कामगारांना सोयी-सुविधा आणि योग्य वेतन दिले. त्याचबरोबरीने कारखान्याच्या निर्णय प्रक्रियेमध्ये युनियन प्रतिनिधींना सहभागी करून घेताना कामगारांना १९ टक्के भाग म्हणजेच शेअर्स दिले. १९८२ मध्ये राज्यातील उद्योग क्षेत्रात वनाझ कामगारांचे मासिक वेतन प्रथम क्रमांकाचे होते. खांडेकर यांनी बहुसंख्य कामागारांना मालकीची घरकुले बांधून दिली. कामगारांच्या सहकार्याने १९८७-८८ मध्ये खांडेकर यांनी वनाझ कारखाना वाचविला. त्यावेळी कामगारांनी ५० टक्क्य़ांहून कमी वेतन घेतले तर काही कामगारांनी स्वेच्छानिवृत्ती घेऊन खांडेकर यांना सहकार्य केले.

Senior Gandhian Dhirubhai Mehta passed away
ज्येष्ठ गांधीवादी धीरूभाई मेहता यांचे निधन; कस्तुरबा हेल्थ सोसायटी झाली पोरकी
Senior educationist writer Meena Chandavarkar passed away
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, लेखिका मीना चंदावरकर यांचे निधन
Baba Ramdev and Acharya Balkrishna in Supreme Court Unreservedly and unconditionally apologized
रामदेव, बाळकृष्ण यांच्याकडून बिनशर्त माफी
Sharad Pawar supporter Praveen Mane join mahayuti
शरद पवार यांचे कट्टर समर्थक महायुतीमध्ये सहभागी… झाले काय?