करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात काही भाग आणि सोसायट्याही प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आल्या असल्याने अशा भागात मीटरचे रिडिंग घेणे शक्य होणार नाही. त्यामुळे ग्राहकांनी स्वत:हून महावितरणचे मोबाइल अ‍ॅप किंवा संकेतस्थळाच्या माध्यमातून मीटरचे र्रींडग पाठविण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात येत आहे. मीटर रीडिंग पाठविण्याचा एसएमएस आल्यापासून रीडिंग पाठविण्यासाठी दरमहा चार दिवसांची मुदतही जाहीर करण्यात आली आहे.

महावितरणकडून केंद्रीकृत वीजबिल प्रणाली सुरू करण्यात आल्यानंतर प्रत्येक महिन्याच्या १ ते २५ तारखेपर्यंत एका निश्चित तारखेला लघुदाब वीजग्राहकांकडील मीटरचे फोटो रिडींग घेण्यात येत आहे. महिन्यामध्ये रीडिंगसाठी निश्चित तारीख ग्राहकांच्या वीजबिलांवर नमूद आहे. मीटर क्रमांकही नमूद आहे. रीडिंगच्या या तारखेच्या एक दिवस आधी महावितरणकडून सर्व ग्राहकांना स्वत:हून रीडिंग पाठविण्याची विनंती ‘एसएमएस’द्वारे केली जाते. आता हा मेसेज मिळाल्यापासून चार दिवसांत ग्राहकांना स्वत:हून रीडिंग पाठविता येईल. रीडिंग पाठविल्यास मीटरकडे लक्ष राहण्यासह वीजवापरावरही नियंत्रण राहील. रीडिंगनुसार वीजबिल आल्याची खात्रीही करता येईल. मीटर सदोष किंवा नादुरुस्त असल्यास त्याची तत्काळ तक्रार करता येईल. रीडिंग अचानक वाढल्यास त्याची कारणे शोधता येतील. शंका समाधानासाठी तक्रार करता येईल. अशा विविध फायद्यांमुळे वीजग्राहकांनी स्वत:हून दरमहा मीटर रीडिंग महावितरणकडे पाठवावे, असे आवाहन महावितरणचे पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केले.

कसे पाठवाल?

महावितरण मोबाइल अ‍ॅपमध्ये ‘सबमिट मीटर र्रिंडग’वर गेल्यास आणि एकापेक्षा जास्त ग्राहक क्रमांक असल्यास रीडिंग पाठवायच्या मीटरचा ग्राहक क्रमांक निवडावा. त्यानंतर मीटर क्रमांक नमूद करावा.र्रींडग घेताना वीजमीटरच्या पटलावर तारीख, वेळेनंतर र्रींडगची संख्या आणि ‘केडब्लूएच’ असे इंग्रजी शब्द दिसल्यानंतरच छायाचित्र काढावे. त्यानंतर रीडिंगची नोंद अ‍ॅपमध्ये करून ते सबमिट करावे. मोबाइल अ‍ॅपमध्ये लॉगीन केल्यानंतर र्रींडग थेट सबमिट करता येईल. www.mahadiscom.in संकेतस्तळावरून र्रींडग पाठविण्यासाठी ग्राहक क्रमांकासोबत ग्राहक नोंदणी आणि लॉगिन आवश्यक आहे.