News Flash

धक्कादायक : चार महिन्याच्या मुलीला झाडाखाली ठेवून अज्ञात महिला पसार

अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल

पुण्यातील चांदणी चौकात चार महिन्याच्या मुलीला झाडाखाली ठेवून अज्ञात महिला पसार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोथरुड पोलिसांना या प्रकाराबद्दल माहिती मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी पोहचत या मुलीला ताब्यात घेतलं आहे.

कोथरुड पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रतिभा जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदणी चौक भागात लहान बाळाला झाडाखाली सोडून एक महिला निघून गेल्याचं आम्हाला समजलं. माहिती मिळताच पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी पोहतच मुलीला ताब्यात घेतलं आहे. बाळाची प्रकृती सध्या चांगली असून तिला ससूनमधील एका संस्थेकडे सोपवण्यात आलं आहे. ही महिला बाळाची आईच असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे, त्यावरुन अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस महिलेचा शोध घेत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2020 9:24 pm

Web Title: four month abandoned girl child found in pune police registered complaint against unknown women psd 91
Next Stories
1 एकाच भागात ३ आत्महत्यांच्या घटनांनी हादरलं पिंपरी-चिंचवड
2 माऊली न आल्याने खंडेरायाची जेजुरी नगरी सुनी सुनी
3 पैशांच्या वादातून मुलानेच केला वडिलांचा खून
Just Now!
X