News Flash

निसर्ग पर्यटनासाठी पुण्यातील चार स्थळांचा प्रस्ताव

दौंडमधील पिंपळगाव, मरगळवाडी, हडपसरमधील हांडेवाडी आणि पाचगाव पर्वती ही चार ठिकाणे रांगेत आहेत.

वन विभागाकडील जमिनी निसर्ग पर्यटनस्थळ म्हणून विकसित करण्यासाठी पुण्यातील चार स्थळांचे प्रस्ताव निसर्ग पर्यटन विकास महामंडळाकडे पाठवण्यात येत आहेत. दौंडमधील पिंपळगाव, मरगळवाडी, हडपसरमधील हांडेवाडी आणि पाचगाव पर्वती ही चार ठिकाणे रांगेत आहेत.
सध्या वारजे, महंमदवाडीजवळील आनंदवन, इंदापूरमधील रुई, करबनवाडी, थेऊर, रामदरा, भांबुर्डा आणि पाचगाव पर्वती या आठ ठिकाणी निसर्ग पर्यटनाचा प्रयोग झाला असून या सर्व ठिकाणी संयुक्त वन व्यवस्थापन समितीही असल्याची माहिती उपवनसंरक्षक सत्यजित गुजर यांनी दिली. ते म्हणाले, ‘‘वन जमिनीवर निसर्ग पर्यटनस्थळ विकसित करण्यात त्या जमिनीवर नव्याने देशी झाडांची लागवड, पर्यटकांना फिरण्यासाठी पायवाट, बसण्यासाठी बाके व पॅगोडे तयार करणे, पिण्याचे पाणी व स्वच्छतागृहांची सोय करणे, तसेच शालेय विद्यार्थ्यांना निसर्गाची माहिती देण्यासाठी फलक लावणे याचा समावेश होतो. या ठिकाणी जाणाऱ्या पर्यटकांची संख्या, स्थळाची देखभाल कोण करणार, वनक्षेत्राला काय फायदा वा तोटा होऊ शकतो या गोष्टींचा विचार करून त्यांच्या विकासाला मान्यता दिली जाते. वनजमिनीचे स्थानिकांच्या मदतीने रक्षण करण्याचा यात हेतू असून त्याद्वारे वनजमिनीवरील अतिक्रमणेही टाळता येतील. वनपर्यटनासाठी पर्यटकांचा भर केवळ राष्ट्रीय उद्याने व अभयारण्यांवर असतो, परंतु निसर्ग पर्यटनस्थळांमुळे त्यांना फार दूर न जाताही निसर्गात फिरण्याचा आनंद घेणे शक्य आहे. त्या-त्या ठिकाणच्या संयुक्त वन व्यवस्थापन समितीवर परिसराच्या देखभालीचे काम सोपवले जाते.’’

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 21, 2016 2:49 am

Web Title: four places of pune proposal for nature tourism
Next Stories
1 गणेशोत्सवाची वर्गणी न दिल्याने ‘उठाबशा’ काढण्याची शिक्षा
2 ठाण्यातील कुख्यात गुंडाला पुण्यात अटक
3 दहीहंडीची वर्गणी न दिल्याने भोसरीत कामगारांना काढायला लावल्या उठाबशा
Just Now!
X