24 October 2020

News Flash

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात चार जण पॉझिटिव्ह; पोलीस निरीक्षकाचा समावेश

सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या संपर्कात आल्याने झाली लागण

प्रातिनिधीक छायाचित्र

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात आज चार जण करोनाबाधित आढळले असून यात एका पोलीस निरीक्षकाचा समावेश आहे. यामुळे आयुक्तालयातील करोनाबाधित अधिकारी आणि कर्मचारी यांची संख्या सहावर पोहचली आहे. दोन दिवसांपूर्वी आयुक्तालयात कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षकाला करोनाची बाधा झाली होती. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची करोनाची चाचणी करण्यात आली होती.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात दोन दिवसांपूर्वी सहाय्यक पोलीस निरीक्षकास करोनाची बाधा झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर अवघं आयुक्तालयची इमारतच निर्जंतुक करुन घेण्यात आली होती. तर संबंधित अधिकाऱ्यांच्या संपर्कात आलेल्या पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांची करोना चाचणी करण्यात आली होती. यामध्ये आज चार जण पॉझिटिव्ह आले आहेत. यात एका वरिष्ठ पोलीस निरीक्षकाचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2020 2:02 pm

Web Title: four positive in pimpri chinchwad police commissionerate including a police inspector aau 85
टॅग Coronavirus
Next Stories
1 घाऊक भुसार बंदच
2 उद्योगधंदे सुरू, मात्र कामगारांचा तुटवडा
3 विहिरीत पडलेल्या मांजरीच्या पिलाला ‘अक्षय’ जीवदान
Just Now!
X