28 September 2020

News Flash

उच्चशिक्षित डॉक्टरची पेटीएमद्वारे फसवणूक; गुन्हा दाखल

केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने ५० हजारांना गंडा

संग्रहित छायाचित्र

पिंपरी-चिंचवडमध्ये एका उच्च शिक्षित डॉक्टरची पेटीएमक़डून बोलत असल्याचे सांगून केवायसी अपडेट करायच्या बहाण्याने मोठी फसवणूक करण्यात आल्याचे समोर आले आहे. या घटनेप्रकरणी शुक्रवारी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी डॉ. मिलिंद शरद गावडे (वय ५७, रा. हिंजवडी) यांनी हिंजवडी पोलिसांत फिर्याद दिली आहे. ही घटना १८ जून रोजी घडली असून गावडे यांनी शुक्रवारी हिंजवडी पोलिसांत तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, फिर्यादी डॉ. मिलिंद गावडे यांच्या खासगी मोबाईल क्रमांकावर अज्ञात आरोपीने ७४७८८६८२८८ या मोबाईल क्रमांकावरुन फोन करीत आपण पेटीएमकडून (patym) बोलत असल्याचे सांगून त्यांचा विश्वास संपादन केला आणि त्यांना केवायसी अपडेट करण्यास सांगितले. परंतु, केवायसी अपडेट न झाल्याने त्याने एक अॅप डाउनलोड करण्यास सांगितले.

हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर त्याद्वारे फोनवरुन बोलणाऱ्या अज्ञात आरोपीने डॉ. गावडे यांच्या खात्यातून ५० हजार रुपये स्वतःच्या खात्यावर ट्रान्सफर करून घेतले. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 8, 2020 11:50 am

Web Title: fraud of highly educated doctor through paytm filed a case with hinjewadi police aau 85 kjp 91
Next Stories
1 मुंबईतील मॉल्समध्ये ‘आरोग्य सेतू’ची ग्राहकांवर सक्ती
2 प्राध्यापकांना निम्मे वेतन; राम मंदिरासाठी मात्र २१ कोटी
3 धर्मादाय आयुक्त कार्यालयाचे काम संथ गतीने
Just Now!
X