27 May 2020

News Flash

मानसोपचार तज्ज्ञांकडून दूरध्वनीद्वारे विनामूल्य समुपदेशन

करोनाच्या कहरात मानसिक आरोग्यासाठी..

संग्रहित छायाचित्र

करोना विषाणू संसर्गाला प्रतिबंध म्हणून लागू करण्यात आलेल्या संचारबंदीच्या काळात रुग्णांचे विनामूल्य समुपदेशन करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञ आणि मानसशास्त्रज्ञांनी दूरध्वनीवरून मोफत समुपदेशन करण्याचा पर्याय निवडला आहे. १४ एप्रिलपर्यंत ही सेवा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

करोना साथ प्रतिबंध रोखण्यासाठी संचारबंदी हा एकमेव पर्याय उपलब्ध आहे. या आजारावर लस किंवा औषध नसल्यामुळे त्याचा प्रसार रोखण्यासाठी घरात बसून राहाण्याचे आवाहन सरकार आणि यंत्रणांकडून करण्यात आले आहे. साथीमुळे असलेले भीतीदायक वातावरण आणि सक्तीचे घरात बसून राहाणे यामुळे अनेकांना मानसिक आरोग्याचे प्रश्न भेडसावणे शक्य आहे. नैराश्य, एकटेपणा, आप्तांच्या काळजीमुळे अस्वस्थ वाटणे अशी लक्षणे दिसल्यास त्यावर वेळेवर इलाज होणे आवश्यक आहे. मात्र बाह्य़ रुग्ण विभागांमध्ये होणारी गर्दी टाळण्यासाठी अनेक डॉक्टरांनी दूरध्वनीवरुन किंवा ऑनलाईन सल्ला देण्यास सुरुवात केली आहे. मानसिक आरोग्याचे प्रश्न असलेल्या व्यक्तींसाठी पुण्यातील मनोविकार तज्ज्ञांनी मोफत समुपदेशन सेवा हाती घेतली आहे.

डॉ. सुचिता अगरवाल, कांचन शेळके, विजय महाले, अस्मिता कुलकर्णी, डॉ. निकेत कासार आणि अमृता काशीकर या तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे. डॉ. कासार म्हणाले, की या काळात मनावर येणारा ताण हाताळण्यासाठी, त्रस्त व्यक्तीला कोणाची तरी मदत मिळाली तर त्याचा उपयोगच होतो. हे लक्षात घेऊन ही कल्पना राबवत आहोत. साधारण १५ मिनिटांपर्यंत समुपदेशन करण्याचा विचार असून ही सेवा संपूर्ण विनामूल्य आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2020 1:30 am

Web Title: free counseling by telephone from a psychiatrist abn 97
Next Stories
1 साखर मुबलक, पण निर्बंधामुळे टंचाईची शक्यता
2 पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर पोलिसांनी केलेल्या मारहाणीत वडिलांचा मृत्यू, मुलाचा दावा
3 कौतुकास्पद! पिंपरी-चिंचवडमध्ये पोलीस कर्मचाऱ्याने वाढदिवस साजरा न करता १०० कुटुंबाला केलं धान्यवाटप
Just Now!
X