News Flash

देहूनगरीत गेल्या ५० वर्षांपासून वारकऱ्यांना नवशा गणपती मंडळाकडून अन्नदान

आजच्या दिवशी तब्बल २० हजार वारकऱ्यांना अन्नदान केले जाते

संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा आज ३३४ व पालखी सोहळा आहे. तो भक्तिमय वातावरणात पार पडत असून लाखो वारकरी गेल्या दोन दिवसांपासून देहूनगरीत दाखल होत आहेत. अनेकदा त्यांच्या जेवणाची भ्रांत असते..वेळेवर जेवायला मिळत नाही. अश्या वेळी नवशा गणपती मित्र मंडळ गेल्या ५० वर्षांपासून वारकऱ्यांची सेवा करत आहेत. त्यांना मोफत जेवण दिलं जात. वारकऱ्यांकडून मिळणारे आशीर्वाद हेच सर्व काही असल्याचे पदाधिकारी सांगतात.

लाखो वैष्णव हे देहूनगरीत दाखल झाले आहेत. सर्वत्र भक्तिमय वातावरण असून हरिनामाचा आणि ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकारामचा जयघोष सुरू आहे. वारकरी हे महाराष्ट्र राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून संत श्रेष्ठ तुकाराम महाराज आणि आषाढी निमित्त आले. यावेळी दुरवरून आलेल्या वारकऱ्यांसाठी मुख्य द्वारासमोरच नवशा गणपती हे मित्र मंडळ असून ते गेली ५० वर्ष झालं अविरतपणे वारकऱ्यांची सेवा करत आहेत. वारकऱ्यांना तांदुळाची खिचडी पापड आणि भाजी मोफत दिली जाते. आजच्या दिवशी तब्बल २० हजार वारकरी या जेवणाचा आस्वाद घेतात.

नवशा गणपती मंडळाचे सदस्य आणि पदाधिकारी पैसे जमा करून वारकऱ्यांना पोटभर जेवण देतात. या उपक्रमामुळे वारकरी देखील भारावून गेले असून जेवणाचा आनंद घेत आहेत. अन्नदान केल्याने समाधान मिळत असल्याचे पदाधिकारी सांगतात. त्याच्या हा उपक्रमामुळे वारकऱ्यांना दोन खास मिळत असून पंढरपुकडे चालण्यास बळ मिळते अश्या भावना वारकऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2019 2:43 pm

Web Title: free meal for warkari in dehu from navsha ganpati mandal scj 81
टॅग : Ashadhi Ekadashi
Next Stories
1 पुणे महापालिकेच्या प्रभाग १ च्या पोटनिवडणुकीत भाजपाच्या ऐश्वर्या जाधव विजयी
2 पुणे : Ola बुक करुन ड्रायव्हरचा खून, कार चोरीला
3 मोसमी पाऊस दुष्काळी भागांत
Just Now!
X