पुणे : करोना आजारपणामध्ये पौष्टिक आहार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशातून रुग्णांसाठी विनामूल्य भोजन हा अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे.

घटेल घटेल असे म्हणताना करोनाचा विळखा अधिकच गहिरा होऊ  लागला आहे. या दुसऱ्या टप्प्यात घरी विलग होणाऱ्यांची संख्याही लक्षणीय आहे. पुण्यामध्ये छोटी तसेच केवळ पती-पत्नी अशा कुटुंबांची संख्या मोठी आहे. घरातील कोणालाही किंवा सर्व जण करोनाबाधित झाल्यास तारांबळ उडते. घरातील महिलेला करोना संसर्ग झाला, तर भोजनाची व्यवस्था कोलमडून जाते. अशा वेळी पौष्टिक आहार उपलब्ध व्हावा म्हणून रुग्णांसाठी जेवणाचे डबे विनामूल्य देण्याचा उपक्रम श्री मुकुंद भवन ट्रस्ट आणि श्री माहेश्वरी समाज श्रीराम मंदिर ट्रस्टने सुरू केला आहे. भोजनाचे हे डबे रुग्णांना संध्याकाळसाठी उपलब्ध राहतील.

या उपक्रमात ज्या रुग्णांना डबे हवे आहेत, त्यांनी रुग्णाचे नाव, पत्ता, करोना सकारात्मक असल्याचे प्रमाणपत्र, डबे नेण्याची व्यवस्था, मोबाइल क्रमांक ही माहिती  ९४२२६५५३२६ या व्हॉट्स अ‍ॅप क्रमांकावर पाठवावी. किंवा https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSfEy3NqWhB0Fgrjqz7n6FLXLHaaFLZmLCntuzPG6zDHH1QMuA/viewform या लिंकवर नोंदणी करावी. कर्वे रस्त्यावरील सावरकर स्मारक येथे दररोज सायंकाळी सहा ते सात या वेळात डबा उपलब्ध होणार आहे.