25 September 2020

News Flash

दिलीप चौधरी यांचे निधन

मुक्त पत्रकार दिलीप गोिवदराव ऊर्फ चाचा चौधरी (वय ५६) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी निधन झाले.

मुक्त पत्रकार दिलीप गोिवदराव ऊर्फ चाचा चौधरी (वय ५६) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने शुक्रवारी निधन झाले. त्यांच्यामागे पाच भाऊ आणि दोन बहिणी असा परिवार आहे. चौधरी यांच्या पार्थिवावर सायंकाळी वैकुंठ स्मशानभूमीतील विद्युतदाहिनीत अंत्यसंस्कार करण्यात आले. महापौर प्रशांत जगताप, माजी उपमहापौर आबा बागूल आणि पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष जितेंद्र अष्टेकर यांनी चौधरी यांना श्रद्धांजली अर्पण केली. स्थायी समितीचे अध्यक्ष बाळासाहेब बोडके, माजी आमदार चंद्रकांत मोकाटे, माजी महापौर दत्तात्रय धनकवडे, राजलक्ष्मी भोसले, राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे, शिवसेनेचे गटनेता अशोक हरणावळ, मनसेचे गटनेता राजेंद्र वागसकर, नगरसेवक दिलीप काळोखे, विशाल तांबे, प्रशांत बधे, रवींद्र धंगेकर, शिवसेनेचे शहर संघटक श्याम देशपांडे, माजी नगरसेवक शिवा मंत्री, गोपाळ चिंतल, नीलेश निकम यांनी चौधरी यांना आदरांजली वाहिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 28, 2016 3:21 am

Web Title: freelance journalist dilip chaudhary passed away
Next Stories
1 निगडीतील अपघातानंतर ट्रकमधील सिलिंडरच्या स्फोटाने घबराट
2 मिश्कील आणि निरागस जाधवसर
3 चित्रबलाक पक्ष्यांचे मोठे सारंगार ओस
Just Now!
X