02 March 2021

News Flash

फेसबुकवर मैत्री करुन महिला डॉक्टरला ४२ लाखांना फसवले

चॅरिटीच्या नावाने विश्वास संपादन करुन लूटले

फेसबुक (प्रतिकात्मक छायाचित्र)

पिंपरी-चिंचवड : फेसबुकवर एका महिला डॉक्टरशी मैत्री करुन तीला सुमारे ४२ लाखांना फसवल्याचे प्रकरण नुकतेच समोर आले आहे. या प्रकरणी भोसरी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर शनिवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. प्रतिभा शामकुंवर (वय ५५, रा. फुगेवाडी) असे या प्रकरणात फसवणूक झालेल्या महिला डॉक्टरचे नाव आहे. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वतः भोसरी पोलिसात फिर्याद दिली. डॉ. प्रतिभा या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात बालरोग तज्ज्ञ आहेत. गेल्या २८ वर्षांपासून त्या या ठिकाणी काम करीत आहेत.

डॉ. प्रतिभा यांची फेसबुकवर माईक नावाच्या इसमाशी ओळख झाली होती. तो देखील अमेरिकेत डॉक्टर असल्याचे प्रतिभा यांना त्याने भासवले होते. एवढंच नव्हे तर मी चॅरिटीचे काम करतो, असे सांगत त्याने डॉ. प्रतिभा यांचा विश्वास संपादन केला होता. काही दिवस फेसबुकवर या दोघांच्या गप्पा गोष्टी झाल्या त्यानंतर त्यांच्यात चांगली मैत्री झाली. त्यानंतर, १३ डिसेंबर २०१७ रोजी आणि ११ जानेवारी २०१८ या दरम्यान अमेरिकेवरून महागडे पार्सल आले असून ते सोडवण्यासाठी बिहार आणि दिल्ली येथील बँकेत पैसे पाठविण्यास आपल्याला सांगण्यात आले होते. यासाठी दिल्ली येथील कस्टम ऑफिसर आणि आरबीआय या ऑफिसमधून बोलणाऱ्या व्यक्तीने मोबाईलवरून संबंधीत व्यक्तीने त्याला बॅंक खाते क्रमांक दिल्याचे डॉ. प्रतिभा यांनी पोलिस तक्ररीत म्हटले आहे.

या फोनवरील माहितीला बळी पडून डॉ. प्रतिभा यांनी ४१ लाख ८२ हजार रुपये त्या बॅंक खात्यांमध्ये भरले. मात्र, त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानुसार त्यांनी भोसरी पोलिसात रात्री उशिरा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी पोलीस निरीक्षक अजय भोसले हे अधिक तपास करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 21, 2018 2:59 pm

Web Title: friendship on facebook and fraud to a female doctor by 42 lakhs
Next Stories
1 पुण्यात ऊसतोड महिला मजुरावर बिबट्याचा हल्ला
2 गाडय़ा उभ्या करण्याच्या वादातून अभियंत्याची हत्या
3 टाकाऊपासून टिकाऊ उत्पादने
Just Now!
X