News Flash

जेएनयू घटनेच्या निषेधार्थ पुण्यात एफटीआयआयच्या विद्यार्थीचे प्रवेशद्वाराबाहेर आंदोलन

एफटीआयआय मधील विद्यार्थ्यांनी जेएनयू घटनेच्या निषेधार्थ प्रवेशद्वाराबाहेर आंदोलन सुरू केले आहे.

एफटीआयआयच्या विद्यार्थीचे प्रवेशद्वाराबाहेर आंदोलन

दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थ्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद देशभर उमटण्यास सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील फिल्म अॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्युट ऑफ इंडिया (एफटीआयआय) मधील विद्यार्थ्यांनी जेएनयूच्या घटनेच्या निषेधार्थ प्रवेशद्वाराबाहेर आंदोलन सुरू केले आहे.

दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील जेएनयूएसयूच्या अध्यक्षा आयशी घोष यांच्यावर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभविप) या संघटनेकडून हल्ला करण्यात आल्याचे बोललेले जात आहे. आता पर्यंत १५ विद्यार्थी हल्ल्यात गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेची माहिती वाऱ्यासारखी देशभर पसरताच, या घटनेचे पडसाद उमटण्यास सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील एफटीआयआयमधील विद्यार्थ्यांनी प्रवेशद्वाराबाहेर आंदोलन सुरू केले असून जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 6, 2020 12:34 am

Web Title: ftii student protests outside pune in protest of jnu incident abn 97
Next Stories
1 अब्दुल सत्तार यांच्याबाबत एकनाथ शिंदेंनी स्पष्ट केली भूमिका
2 स्वप्न बघायचं कोणी काही कारण नाही; सरकार पाच वर्षे चालेल : वळसे पाटील
3 आमचा डीएनए विरोधी पक्षात बसण्याचा : प्रविण दरेकर
Just Now!
X