26 February 2021

News Flash

स्वागत करणं भोवलं; गुंड मारणेच्या ताफ्यातील १७ जणांना बेड्या; २०० जणांचा शोध सुरू

मारणेचा शोध घेण्यासाठी चार तर इतर आरोपींचा शोध घेण्यासाठी नऊ पथक रवाना

(प्रातिनिधिक छायाचित्र)

गुंड गजानन मारणे याच स्वागत करणं साथीदारांना चांगलंच महागात पडलं आहे. तळोजा कारागृहातून मारनेची सुटका होताच त्याचा समर्थनात आणि स्वागत करण्यासाठी पुणे आणि परिसरातील तब्बल २०० वाहने हजर होती. द्रुतगतिमार्गावरील उर्से टोल नाका येथील फूड मॉल येथे फटाके वाजवून आणि आरडाओरडा करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न केला होता. या प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मारनेच्या ताफ्यातील १७ जणांना बेड्या ठोकल्या असून ११ आलिशान मोटरी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.  अद्याप मुख्य आरोपी गजनन मारणे हा फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी चार पथक रवाना केली असून इतर १५०-२०० जणांचा शोध घेण्यासाठी ९ तपास पथक त्याचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आली आहेत. अशी माहिती पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दिली आहे.

सविस्तर माहिती अशी की, गजनन उर्फ गज्या मारणे हा नुकताच तळोजा कारागृहातून सुटला असून त्यांच्या स्वागतासाठी तब्बल २०० वाहनातून साथीदार आले होते. सुटका होताच पुणे-मुंबई द्रुतगतिमार्गावर फिल्मीस्टाईल रांगेत मोटरी चालवत एक प्रकारच वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला. त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले. दरम्यान, उर्से टोल नाका येथील फूड मॉल इथे थांबून फटाके वाजवत आरडा ओरडा करून दहशत पसरविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. याचे चित्रीकरण ड्रोन द्वारे करण्यात आले होते. याप्रकरणी गजानन मारणे याच्यासह ताफ्यातील ३० ते ४० गाड्यांमध्ये प्रवास करणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी एक ड्रोन, महागड्या ११ मोटारी आणि १२ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. अद्याप २०० वाहने आणि आरोपी यांना अटक करणे बाकी असून ९ तपास पथके आरोपींच्या शोध घेण्यास रवाना करण्यात आले आहेत. घटने प्रकरणी आत्तापर्यंत १७आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.

बेड्या ठोकण्यात आलेले आरोपी खालील प्रमाणे

सागर सुखदेव थिटमे, संतोष चंद्रकांत शेलार, रघुनाथ चंद्रकांत किरवे, सागर वसंत शेडे, मावली रामदास सोनार, आशिष वसंत अवगडे, अनिल राजाराम मदने, मयुर अर्जुन गाडे, व्यकंटेश व्यकंटया स्वर्पराज, शुभम मनोहर धुमणे, शैलेश रविंद्र गावडे, अखिल जयवंत उभाळे, अभिजित विजय घारे, अनिल संपत्त जाधव, निलेश रामचंद्र जगताप, रोहन अर्जुन साठे, योगेश राम कावली असे एकुन १७ आरोपीना अटक करण्यात आले आहे.

याप्रकरणी मुख्य आरोपीसह इतर आरोपी फरार

मुख्य आरोपी गजानन पांडुरंग मारणे, रुपेश कृष्णराव मारणे, सचिन अप्पा ताकवले, श्रीकांत संभाजी पवार, अनंता ज्ञानोबा कदम, प्रदिप दत्तात्रय कंदारे, बापु श्रीमंत बाबर, गणेश नामदेव हुंडारे, सुनिल नामदेव बनसोड हे व इतर आरोपी यांना अटक करणे बाकी असून त्यांच्या शोध घेण्यासाठी चार पोलीस पथके रवाना केली आहेत. सदरची कारवाई पोलीस उपायुक्त सुधीर हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 21, 2021 3:53 pm

Web Title: gajanan marane gund police crime 17 arrest nck 90
Next Stories
1 पुण्यात ११ ते ६ नाईट कर्फ्यू! २८ फेब्रुवारीपर्यंत महाविद्यालये राहणार बंद
2 उपमुख्यमंत्री अजित पवार तासभर आधीच बैठकीच्या ठिकाणी; अधिकाऱ्यांची झाली धावपळ
3 पुण्यात पॉवर पेट्रोल शंभरीपार!
Just Now!
X