05 March 2021

News Flash

चैतन्याच्या लाटेवर सुखकर्त्यांचे आगमन

गणरायाच्या कृपेने यंदा श्रावणामध्ये झालेल्या पावसाने राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर झाले.

* (वरील छायाचित्र) ढोल-ताशांच्या निनादात वैभवशाली गणेशोत्सवाच्या मिरवणुकीमध्ये लक्ष्मी रस्त्यावरील लिंबराज महाराज चौकामध्ये पथकांमधील युवक-युवती आणि गणेशभक्तांची गर्दी झाली होती. * (डावीकडून पहिले) पारंपरिक चांदीच्या पालखीतून काढण्यात आलेल्या मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपतीच्या मिरवणुकीमध्ये कार्यकर्ते हेच पालखीचे भोई झाले होते. * (उजवीकडील छायाचित्र) सात अश्वांच्या रथातून काढण्यात आलेल्या श्री जोगेश्वरी मंडळ या मानाच्या दुसऱ्या गणपतीचे छायाचित्र टिपण्यासाठी गणेशभक्तांचे मोबाईल असे सरसावले. (छायाचित्रे - संदीप दौंडकर, तन्मय ठोंबरे)

ढोलताशांच्या निनादात ‘मोरया’चे स्वागत; मानाच्या गणपतींची विधिवत पूजेने मुहूर्तावर प्रतिष्ठापना

दणाणून टाकणारा ढोल-ताशांचा निनाद, बँडपथकांच्या आविष्कारातून कानावर येणाऱ्या अवीट गीतांच्या सुरावटी, कार्यकर्त्यांनी केलेला ‘बाप्पा मोरया’चा गजर अशा चैतन्यमय वातावरणात निघालेल्या मिरवणुकांनी गणरायाचे दहा दिवसांच्या मुक्कामासाठी सोमवारी आगमन झाले. सकाळीच घरातील गणपतीची प्रतिष्ठापना करून झाल्यावर पारंपरिक पेहरावासह कार्यकर्ते आणि ढोल-ताशा पथकातील युवक-युवती मिरवणुकांसाठी सज्ज झाले. मानाच्या गणपतींची विधिवत पूजेने मुहूर्तावर प्रतिष्ठापना करण्यात आली.

गणरायाच्या कृपेने यंदा श्रावणामध्ये झालेल्या पावसाने राज्यावरील दुष्काळाचे सावट दूर झाले. श्रावण संपतानाच कार्यकर्त्यांना गणेशोत्सवाचे वेध लागले होते. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाच्या तयारीची प्रतीक्षा संपली आणि सोमवारी गणेश चतुर्थीला घराघरांमध्ये आणि सार्वजनिक मंडळांमध्ये गणरायाचे वाजत-गाजत आगमन झाले. अनेकांनी यापूर्वीच नोंद केलेली गणेशमूर्ती रविवारी सायंकाळी घरी आणली होती. काहींनी सोमवारी सकाळी गणेशमूर्ती आणून मुहुर्तावरच घरगुती गणपतींची प्राणप्रतिष्ठापना केली. प्राणप्रतिष्ठापनेची पूजा सांगणाऱ्या गुरुजींची पहाटेपासूनच पायाला भिंगरी लागल्याप्रमाणे धावपळ सुरू होती. ज्यांना गुरुजी उपलब्ध होऊ शकले नाहीत त्यांनी   पूजेसाठी ध्वनिफीत, सीडी, व्हीसीडी आणि अ‍ॅप अशा आधुनिक माध्यमांचा उपयोग केला.

घरातील गणरायाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर युवक -युवती मंडळांच्या प्रतिष्ठापना मिरवणुकीसाठी घराबाहेर पडले. मानाच्या गणपती मंडळांच्या मिरवणुकोंमुळे क सबा गणपती मंदिर ते तुळशीबाग आणि मंडई परिसर या शहराच्या मध्यवर्ती भागामध्ये गणेशभक्तोंची गर्दी लोटली होती. या भागातील रस्ते सकोळपासूनच वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आले होते. दोन मंडळांच्या मिरवणुको समोरासमोर आल्यानंतर दोन्हीक डच्या ढोल- ताशांच्या गजरात एक मेकोंचे तालही मिसळून गेले. मात्र, ढोल-ताशा पथकोंमधील कोर्यकर्त्यांनी रस्त्याची एवढी जागा व्यापली की गणेशभक्तोंना थांबून या वादनाचा आनंद लुटता आला नाही, अशी भावना कोही नागरिकोंनी व्यक्त केली. मात्र, रस्त्यावर येऊन मिरवणुको पाहण्यापेक्षा विविध वाहिन्यांवर होत असलेले थेट प्रक्षेपण घरसबल्या पाहता येत असल्यामुळे यंदा रस्त्यांवर गर्दीची रेटारेटी झाली नाही.

 गणराज रंगी..

pun08* पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती या मानाच्या पहिल्या गणपतीची प्रतिष्ठापना प्रकाश प्रभुणे यांच्या हस्ते सकाळी ११ वाजून ३६ मिनिटांनी झाली. त्यापूर्वी उत्सव मंडपापासून सकाळी साडेआठ वाजता मिरवणूक सुरू झाली. देवळाणकर बंधूंचे नगारावादन, प्रभात बँडपथक, श्रीराम आणि शिवतेज ढोल-ताशा पथकांचे वादन असलेल्या या मिरवणुकीमध्ये चांदीच्या पालखीत विराजमान असलेली श्रींची मूर्ती कार्यकर्त्यांनी उत्सव मंडपामध्ये आणली.

*श्री तांबडी जोगेश्वरी या मानाच्या दुसऱ्या गणपतीची मिरवणूक सकाळी दहा वाजता सुरू झाली. सतीश आढाव यांचे नगारावादन, न्यू गंधर्व बँडपथक, शिवमुद्रा ढोल-ताशा पथकाचा मिरवणुकीमध्ये सहभाग होता. गंगोत्री ग्रीन बेल्टचे मिलिंद केळकर आणि प्रसिद्ध गायिका अपर्णा केळकर यांच्या हस्ते साडेबारा वाजता गणरायाची प्रतिष्ठापना झाली.

* गणपती चौकातून श्री गुरुजी तालीम या मानाच्या तिसऱ्या गणपतीची मिरवणूक फुलांनी सजविलेल्या आकर्षक रथातून सकाळी दहा वाजता सुरू झाली. जयंत नगरकर यांचे नगारावादन, गुरुजी प्रतिष्ठान, शिवमुद्रा आणि शिवगर्जना ही तीन ढोल-ताशा पथके मिरवणुकीमध्ये होती. मणिलाल गड्डा यांच्या हस्ते दुपारी १२ वाजून ४५ मिनिटांनी श्रींची प्रतिष्ठापना केली गेली.

pun05* तुळशीबाग या मानाच्या चौथ्या गणपतीची प्रतिष्ठापना पं. वसंतराव गाडगीळ यांच्या हस्ते दुपारी साडेबारा वाजता करण्यात आली. त्यापूर्वी उत्सव मंडपापासून निघालेल्या मिरवणुकीत गजलक्ष्मी, नादब्रह्म आणि रुद्रगर्जना ही ढोल-ताशा पथके सहभागी झाली होती.

* केसरीवाडा या मानाच्या पाचव्या गणपतीच्या मिरवणुकीमध्ये बिडवे बंधू यांचे सनईवादन आणि श्रीराम ढोल-ताशा पथक होते. रोहित टिळक आणि प्रणती टिळक यांच्या हस्ते सकाळी साडेदहा वाजता श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली.

* ताल, वाद्यवृंद आणि शंभूगर्जना या तीन ढोल-ताशा पथकोंचा सहभाग श्रीमंत भाऊ साहेब रंगारी ट्रस्टच्या मिरवणुकीत होता.

महापौर प्रशांत जगताप यांनी कोही कोळ रथाचे सारथ्य केले. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सकोळी ११ वाजता प्रतिष्ठापना झाली. स. प. महाविद्यालयाचे प्राचार्य दिलीप शेठ यांच्या हस्ते दुपारी साडेबारा वाजता अखिल मंडई मंडळाच्या शारदा-गजाननाची प्रतिष्ठापना

करण्यात आली. त्यापूर्वी फु लांनी सजविलेल्या रथातून मिरवणूक कोढण्यात आली.
* देवळाणक र बंधू यांचे नगारावादन, प्रभात आणि दरबार बँडपथके श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या मिरवणुकीमध्ये अग्रभागी होती. इंदूर येथील त्रिपदी परिवाराचे बाबासाहेब तराणेक र यांच्या हस्ते सकोळी ११ वाजून १ मिनिटांनी श्रींची प्राणप्रतिष्ठापना झाली. नेहरू स्टेडियमच्या सारस हॉल येथे पुणे फे स्टिव्हलचे संस्थापक –अध्यक्ष सुरेश कलमाडी, अभिनेत्री भार्गवी चिरमुले, अनुजा साठे यांच्या हस्ते आरती क रू न सकोळी १० वाजता श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2016 12:58 am

Web Title: ganesh chaturthi celebrations begin in pune
Next Stories
1 विघ्नहर्त्यांच्या निर्विघ्न उत्सवासाठी अहोरात्र पहारा!
2 अल्प गटातील घरे उच्च दराने?
3 भारत कधीही हिंदू राष्ट्र होणार नाही!
Just Now!
X