News Flash

सार्वजनिक गणेश मंडळांसाठी घरगुतीपेक्षा कमी दराने वीज

गणेश मंडळांसाठी यंदाही महावितरण कंपनीच्या वतीने सवलतीच्या दरात वीजपुरवठा करण्यात येणार आहे.

सुरक्षिततेच्या दृष्टीने अधिकृत वीजजोड घेण्याचे आवाहन
गणेशोत्सवामध्ये सार्वजनिक गणेश मंडळांसाठी यंदाही महावितरण कंपनीच्या वतीने सवलतीच्या दरात वीजपुरवठा करण्यात येणार आहे. प्रतियुनिट ३ रुपये ७१ पैसे या घरगुतीपेक्षाही कमी असलेल्या दरात मंडळांना तात्पुरता वीजपुरवठा करण्यात येणार आहे. धोका टाळण्यासाठी मंडळांनी अधिकृत वीजजोडणी घ्यावी व गणेशोत्सवासाठी वीजसुरक्षेबाबत गांभीर्याने उपाययोजना कराव्यात, असे आवाहन महावितरणच्या वतीने करण्यात आले आहे.
सर्व धर्मीयांच्या सार्वजनिक उत्सवांसाठी तात्पुरत्या वीजजोडणीसाठी प्रतियुनिट महावितरणकडून ३ रुपये ७१ पसे अधिक इंधन अधिभार असे वीजदर आकारण्यात येतात. धार्मिक उत्सवांसाठी अधिकृतच वीजपुरवठा घेण्यास प्रोत्साहन मिळावे व त्यातून सार्वजनिक सुरक्षेला महत्त्व दिले जावे, यासाठी गणेशोत्सवातही तात्पुरत्या वीजजोडणीचा दर घरगुती वीजदरापेक्षा कमी ठेवण्यात आला आहे.
सार्वजनिक गणेशोत्सवासाठी मंडप किंवा रोषणाई, देखाव्यांसाठी लागणारी वीजयंत्रणा ही अधिकृत वीज कंत्राटदारांकडूनच करून घेण्यात यावी व अर्थिगचीही खबरदारी घेण्यात यावी. वापरण्यात येणाऱ्या वाहिन्या वीजभारासाठी सक्षम नसल्यास शॉर्टसíकटचा धोका निर्माण होतो. याशिवाय सध्या पावसाळी दिवस असल्याने तसेच मंडपासाठी पत्र्यांचा वापर होत असल्याने वाहिन्या जोडलेल्या किंवा अनेक ठिकाणी तुटलेल्या असल्यास वीजपुरवठा खंडित होण्यासह अपघाताची मोठी शक्यता असते.
गणेशोत्सवात वीजपुरवठा आणि जनरेटरसाठी स्वतंत्र न्यूट्रल घेणे अत्यावश्यक आहे. वीजपुरवठा बंद असताना जनरेटर सुरू केल्यास एकाच न्यूट्रलमूळे जनरेटरमधील वीज ही लघुदाब वाहिनीत प्रवाहित होते आणि त्यातून जीवघेणे अपघात घडतात. त्यामुळे भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सार्वजनिक गणेश मंडळांनी वीजसुरक्षेबाबत तडजोड करू नये, असे आवाहन महावितरणने केले आहे.

तातडीच्या मदतीसाठी संपर्क
तातडीच्या मदतीची संभाव्य गरज पाहता मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी २४ तास सुरू असणारे महावितरण कंपनीचे टोल फ्री क्रमांक १९१२, १८००२००३४३५ किंवा १८००२३३३४३५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 17, 2016 5:46 am

Web Title: ganesh mandals to get electricity at low rates
Next Stories
1 जादा निकालासाठी गुणांची खिरापत?
2 लोकशाहीत अभिप्रेत नाही, तेच आपल्याकडे घडते
3 शहरबात पिंपरी-चिंचवड : ‘लक्ष्य २०१७’ : युती आणि आघाडीचे ‘राजकारण’
Just Now!
X