29 September 2020

News Flash

गणपतीच्या विविध रूपातील चित्रांचे प्रदर्शन – ‘पेन आर्ट’ कलाकृतीतून पर्यावरणाचा संदेश

कसबा पेठेतील हनुमान मंडळ प्रतिष्ठानतर्फे गणपतीच्या ‘पेन आर्ट’ (गिगलिंग) प्रकारातील चित्रांचे प्रदर्शन आयोजित केले आहे

कसबा पेठेतील हनुमान मंडळ प्रतिष्ठानतर्फे गणपतीच्या ‘पेन आर्ट’ (गिगलिंग) प्रकारातील चित्रांचे प्रदर्शन आयोजित केले आहे. अक्षय एकाडे या तरूण चित्रकाराने ही चित्रे रेखाटली आहेत. या चित्रांमधून नागरिकांना पर्यावरणाचा संदेश देण्यात आला आहे.
अक्षय याने साध्या रंगीत बॉलपेनचा वापर करून ही चित्रे रेखाटली आहेत. झाडे लावा झाडे जगवा, पाणी वाचवा, सायकल चालवा, कापडी-कागदी पिशव्या वापरा असा पर्यावरणविषयक संदेश देणारी, तसेच बाळकृष्ण, विठ्ठल, बासरी वादन करणारा अशा गणपतीच्या विविध भावमुद्रा दाखवणारी चित्रे प्रदर्शनात आहेत. तला चांगला प्रतिसाद मिळत असून, या कलाकृती पाहण्यासाठी भाविकांची गर्दी होत आहे. लोकांना गणेशाची विविध रूपे पाहायला मिळावी. त्याचबरोबर त्यांच्यामध्ये पर्यावरण रक्षणाचा संदेश पोहोचावा या हेतूने ही चित्रे प्रदर्शित करण्यात आली आहेत, असे मंडळाकडून सांगण्यात आले. या कलाकृती  कसबा पेठेतील माणिक चौक येथे सायंकाळी ७ ते ११ वाजेपर्यंत पुढील दोन दिवस हे प्रदर्शन पाहता येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 25, 2015 3:25 am

Web Title: ganesh utsav exhibition pen art
Next Stories
1 स्मार्ट सिटी म्हणजे काय होणार, याचे उत्तर मिळणार..
2 विसर्जन मिरवणुकीत वीज यंत्रणेपासून राहा सतर्क!
3 जोडून आलेल्या सुट्टय़ांमुळे आरक्षित जागांवरील प्रवेशाचा खोळंबा
Just Now!
X