05 December 2020

News Flash

VIDEO: शिल्पकलेने नटलेले पुण्यातील त्रिशुंड गणपती मंदिर

महाराष्ट्रात अशा प्रकारचे मंदिर पाहायला मिळत नाही

पुण्यातील त्रिशुंड गणपती मंदिर संपूर्णपणे काळ्या पाषाणात केलेले मंदिर पेशवाईतील शिल्पकलेचा अनोखा नमुना आहे. सोमवार पेठेत असणारं त्रिशुंड गणेश मंदिर हे त्याच्या समकालीन मंदिरांपेक्षा खूप देखणे आहे. हे मंदिर पूर्वाभिमुख आहे. मंदिराच्या रचनेवर राजस्थानी, माळवा तसेच दाक्षिणात्य स्थापत्यशैलीचा प्रभाव आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात तीन सोंडा असलेली मोरावर बसलेली गणपतीची मूर्ती आहे. मंदिराला एक प्रशस्त तळघर आहे. संपूर्ण महाराष्ट्रात अशा प्रकारचे मंदिर पाहायला मिळत नाही. लोकसत्ताच्या ‘तू सुखकर्ता’ या गणेशोत्सव विशेष कार्यक्रमात आपण त्रिशुंड गणपती मंदिराबद्दल जाणून घेणार आहोत.

पुण्यातील मानाचे तसंच इतर गणपतींचे महत्त्व आणि वैशिष्ट्य आपण अशाच व्हिडीओंच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 29, 2020 7:55 am

Web Title: ganeshotsav pune trishund ganpati temple of pune sgy 87
टॅग Ganeshotsav
Next Stories
1 पुण्यात एकाच दिवशी ४० रुग्णांचा मृत्यू, तर १,७८१ जण आढळले पॉझिटिव्ह
2 पत्नीला माहेरी पाठवले म्हणून पोलीस मेहुणीवर कुऱ्हाडीने वार; आरोपी फरार
3 “फडणवीस आणि मी एकत्र येणार म्हटलं की..”; अजित पवारांची पॉवरफूल फटकेबाजी
Just Now!
X