News Flash

पुणे हादरलं! तरुणीवर सामूहिक बलात्कार करुन छातीत झाडली गोळी, मात्र मोबाईलमुळे बचावली

तिघांनी बलात्कार केल्यानंतर दोघे येत आहेत थांब, असं या मुलीला सांगण्यात आलं

प्रातिनिधिक फोटो (फाइल फोटो आणि गुगल मॅपवरुन नकाशा साभार)

पुण्यातील सहकार नगर भागात राहणाऱ्या अल्पवयीन तरुणीवर तिघांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली. या घटनेनंतर आरोपीने तिच्या छातीवर गोळी झाडली. मात्र छातीत मोबाईल ठेवल्याने यातून ती बचावली असून या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली. तर या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हडपसर येथे राहणाऱ्या २४ वर्षीय कृष्णा ऊर्फ रोहन ओव्हाळ, वारजे माळवाडीतील २० वर्षीय निरंजन ऊर्फ निलेश शिंदे या दोघांना या प्रकरणात अटक करण्यात आली असून आणखी तिघांचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी ही तिच्या मैत्रिणी सोबत एका मित्राच्या वाढदिवसाला वारजे माळवाडी येथे गेली होती. तेव्हा वाढदिवस झाल्यानंतर तिला एका खोलीत नेऊन तिच्यावर तिघांनी बलात्कार केला. त्यानंतर ती तेथून निघाल्यावरही या नराधमांनी या तरुणीचा पिच्छा सोडला नाही. या तरुणी तीन आरोपींपैकी एकाने थांबवलं. ‘आणखी दोघे जण येणार आहेत. तू थांब नाही तर तुला मारून टाकेल, याबद्दल कोणाला सांगायचं नाही,’ असा दम दिला.

पीडित तरुणीने तिथे थांबण्यास नकार दिला. त्यानंतर एका आरोपीने पोटमाळ्यावर असलेली पिस्तूल काढली आणि तिच्या छातीवर गोळी झाडली. पण पीडित तरुणीने मोबाईल छातीजवळ ठेवल्याने तिचा जीव वाचला. तिला थोडी दुखापत झाली.

या तरुणीला आणि तिच्या मैत्रिणीला कात्रज येथे सोडून देण्यात आले. तेथील एका रुग्णालयात बंदुकीच्या गोळीमुळे झालेल्या छोट्या जखमेवर उपचार करून ती तरुणी घरी गेली. त्यानंतर या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली. तक्रार दाखल केल्यानंतर दोघांना अटक केली असून आणखी तिघांचा शोध सुरू असल्याचे  दत्तवाडी पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 29, 2021 2:58 pm

Web Title: gang rape in pune criminals tired to killed victim but bullet hit her mobile svk 88 scsg 91
Next Stories
1 एक कोटी लोकांना पाच हजार द्या आणि मग लॉकडाऊन करा; भाजपाची मोठी मागणी
2 पिंपरी-चिंचवड : नगरसेविकेच्या मुलाचा डोक्यात गोळी लागल्याने मृत्यू; आत्महत्या की अपघात शोध सुरु
3 Coronavirus – पुण्यात दिवसभरात ४ हजार ४२६ नवीन करोनाबाधित, २८ रुग्णांचा मृत्यू
Just Now!
X