02 December 2020

News Flash

पिंपरी-चिंचवड, पुणे शहरात परराज्यातून चोरून आणलेल्या मोटारी विकणारी टोळी गजाआड

१३ महागड्या मोटारी पोलिसांनी जप्त केल्या आहेत.

पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरात परराज्यातून चोरून आणलेल्या महागड्या मोटारींचा चेसी नंबर बदलून त्या कमी किंमतीत विकणाऱ्या टोळीला गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून एक कोटी ३९ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून चार जणांना अटक करण्यात आली आहे.

१३ महागड्या मोटारी पोलिसांनी जप्त केल्या आहेत. यातील मुख्य आरोपी हा इन्शुरन्स कंपनीकडून अपघातात नुकसान झालेली मोटर घेऊन आणि हुबेहूब रंगाची मोटार इतर राज्यातून चोरून आणून त्याचा चेसी नंबर बदलून मोटार विकत असे अशी माहिती पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिली आहे.

या प्रकरणी मनजीत जोगिंदरसिंग मारवा, दीपक चमनलाल खन्ना, प्रतीक उर्फ नागेश छगन देशमुख आणि हारून शरीफ शेख अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. यापैकी, मनजीत मारवा याच्या विरोधात दिल्ली, हरियाणा, येथे १२ गुन्हे दाखल आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मनजित मारवा हा पुण्याच्या कोढवा भागात नविन गोडाऊन भाड्याने घेऊन त्यात गॅरेज सुरू करण्याच्या तयारीत होता. आरोपी मनजित मारवा हा इन्शुरन्स कंपनीकडून अपघातात नुकसान झालेल्या चारचाकी मोटारी कागदपत्रासह विकत घ्यायचा. आरोपी दिपक खन्ना गाडया चोरी करून मनजित मारवा याला देत असल्याचं समोर आलं आहे. त्यात फॉर्च्युनर, इनोव्हा, मारुती इर्टीगासह इतर मोटारीचा समावेश आहे. त्यानंतर त्या गाडीवर अपघातात नुकसान झालेल्या गाडीचा चेसी व इंजिन नंबर असलेला भाग लावून गाडीची पुन्हा कमी किंमतीत विक्री करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

आरोपी मनजित मारवा व दिपक खन्ना हे सराईत गुन्हेगार असून आरोपी मनजित मारवा याच्या विरूध्द दिल्ली, हरीयाणा येथे एकूण १२ गुन्हे दाखल आहेत. तसेच आरोपी दिपक खन्ना याचे विरूध्द दिल्ली, हरीयाणा, पंजाब या ठिकाणी ३८ गुन्हे दाखल आहेत. सदरची कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश पाटील यांच्या पथकाने केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2020 4:29 pm

Web Title: gang who sell stolen cars from other states in pune pimpri chinchwad arrested by police kjp 91dmp 82
Next Stories
1 ठेकेदारांकडून पैशांची मागणी
2 हनुमान फळाचा हंगाम सुरू
3 वाढत्या पावसामुळे पुणे जिल्ह्यात गंजरोधक वीज खांब
Just Now!
X