दोन संशयित ताब्यात

देवदर्शनाहून घरी परतणाऱ्या महिलेला धमकावून मोटारचालक आणि त्याच्या साथीदाराने महिलेवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उरुळी कांचन येथील शिंदवणे घाटात शुक्रवारी (१६ जून) रात्री घडली. पीडित महिलेने दिलेल्या मोटारीच्या क्रमांकावरून पोलिसांनी आरोपींची नावे शोधून काढली असून याप्रकरणात लोणीकाळभोर पोलिसांकडून दोन संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे.

pune police warning goons after Salman Khan House Firing Case
सलमान खानच्या घराजवळ गोळीबार, पुण्यातल्या ‘भाईं’ची झाडाझडती
haryana school bus accident
हरियाणातील स्कूलबस अपघात प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई; शाळेच्या मुख्यध्यापिकेसह तिघांना अटक
nashik crime news, nashik frau marathi news
नाशिकमध्ये कर्जदारांची मालमत्ता ताब्यात घेत फसवणूक, दोन सावकारांविरोधात गुन्हा; छाप्यात करारनामे, कोरे मुद्रांक, धनादेश जप्त
The crime branch police demanded a bribe of 10 lakhs crime news
गुन्हे शाखेच्या पोलिसाने मागितली १० लाखांची लाच; काशिमिरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

पीडित महिलेने यासंदर्भात लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तिने दिलेल्या फिर्यादीनुसार अजय नवले (रा. पारनेर) आणि त्याचा साथीदार पक्या याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना शनिवारी सायंकाळी ताब्यात घेण्यात आले. तक्रारदार महिला मूळची दौंड तालुक्यातील केडगावची रहिवासी आहे. पुरंदर तालुक्यातील सासवडनजीक असलेल्या नारायणपूर येथील दत्त मंदिरात अनेक भाविक दर्शनासाठी जातात. ही महिला शुक्रवारी नारायणपूर येथील मंदिरात दर्शनासाठी गेली होती. दर्शन घेऊन सायंकाळी ती घरी निघाली. प्रवासी वाहतूक करणाऱ्या जीपने ती पारगाव चौफुला येथे पोहोचली. पारगाव चौफुला येथे ती रात्री दहाच्या सुमारास केडगावच्या दिशेने जाणाऱ्या वाहनाची वाट पाहत थांबली होती.

त्यावेळी मोटारीतून आलेला नवले आणि त्याचा साथीदार पक्या यांनी तिला केडगाव येथे सोडतो असे सांगितले. उशीर होत असल्याने महिलेने त्यांना होकार दिला. त्यानंतर आरोपींनी महिलेला धमकावून धावत्या मोटारीत तिच्यावर बलात्कार केला. हा प्रकार कोणाला सांगितल्यास महिलेला जीवे मारण्याची धमकी त्यांनी दिली. त्यानंतर शिंदवणे घाटात महिलेला सोडून आरोपी पसार झाले. त्यावेळी तेथून जात असलेल्या दोन दुचाकीस्वारांकडे तिने मदत मागितली आणि तिच्यावर गुदरलेल्या प्रसंगाची माहिती त्यांना दिली. महिलेने दुचाकीस्वारांच्या मदतीने पसार झालेल्या मोटारचालकाचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर घाबरलेल्या महिलेला दुचाकीस्वारांनी उरुळी कांचन येथे सोडले. तिने या घटनेची माहिती लोणीकाळभोर पोलिसांना दिली आणि मोटारीचा क्रमांक पोलिसांना दिला. पोलीस निरीक्षक बी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक रणजितसिंह परदेशी तपास करत आहेत.