News Flash

पुण्यात २३ वर्षीय महिलेवर बलात्कार; दोघांना अटक

रागाच्या तिरमिरीत ही तरूणी रात्रीच्यावेळी घरातून बाहेर पडली.

Gangrape : या घटनेमुळे कोंढवा परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी सतीश जयपाल माने (वय २३) आणि मारुती शिंदे (वय ३१) या दोन आरोपींना सिद्धार्थनगर येथून अटक केली. तर आणखी एकजण फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पुण्याच्या कोंढवा परिसरात एका २३ वर्षीय तरूणीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही तरूणी येरवडा परिसरात वास्तव्याला होती. भावाशी कडाक्याचे भांडण झाल्यामुळे रागाच्या भरात ही तरूणी रात्रीच्यावेळी घरातून बाहेर पडली. त्यानंतर तिने आपल्या पतीच्या कोंढवा येथील घरी जाण्यासाठी रिक्षा पकडली. रिक्षा पकडून ती कोंढव्याच्या ब्रह्मा सनिसिटी सोसायटीच्या परिसरात उतरली. येथून आपल्या घरी जाण्यासाठी तिला दुसऱी रिक्षा करावी लागणार होती. दरम्यानच्या काळात तिने आपल्या पतीला फोन करण्यासाठी जवळच्या इमारतीमधील एका सुरक्षा रक्षकाडून फोन मागितला. मात्र, सुरक्षा रक्षकाच्या फोनची बॅटरी संपत आली असल्याने ही महिला आपल्या पतीला फोन करू शकली नाही.  या सुरक्षा रक्षकाने महिलेला घरी जाण्यासाठी रिक्षा पकडून देण्याचा प्रयत्नही केला. रिक्षा मिळत नसल्यामुळे ही महिला सनश्री सोसायटीपर्यंत चालत गेली. त्याठिकाणी तिला एक रिक्षा मिळाली. महिलेने आपल्याला कोथरूड येथे जायचे असल्याचे सांगितले.

कोथरूडच्या दिशेने प्रवास सुरू झाल्यानंतर रिक्षाचालकाने महिला एकटी असल्याची खात्री करून घेतली. त्यानंतर आपल्या मित्राला मार्केटयार्ड येथे बोलवून घेतले. येथून दोघेजण महिलेला घेऊन सिद्धार्थनगर येथे नेले. दरम्यानच्या काळात महिलेने आपल्याला सोडून देण्याची विनंती केली. मात्र, रिक्षाचालक आणि त्याच्या मित्राने धाक दाखवून महिलेला रिक्षातच बसवून ठेवले. सिद्धार्थनगर येथे आल्यानंतर रिक्षाचालकाच्या मित्राने महिलेशी जबरदस्तीने संभोग केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशीही महिलेला दारू पाजून तिच्यावर बळजबरी करण्यात आली. दुसऱ्या दिवशी महिलेला कॅम्प रोड परिसरात सोडायला जात असताना रिक्षाचालकाने त्याच्या आणखी एका मित्राला फोन करून बोलावून घेतले. या मित्रानेही रिक्षात महिलेचा विनयभंग केला. यानंतर दोघेजण तिला कॅम्प परिसरात सोडून निघून गेले, असे महिलेने आपल्या जबाबात म्हटले आहे. या घटनेमुळे कोंढवा परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर पोलिसांनी सतीश जयपाल माने (वय २३) आणि मारुती शिंदे (वय ३१) या दोन नराधमांना सिद्धार्थनगर येथून अटक केली. तर आणखी एकजण फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 15, 2017 11:59 am

Web Title: gangrape on 23 year old girl in pune
Next Stories
1 महोत्सवांसाठी पाच कोटींची उधळपट्टी
2 मोशीतील प्रदर्शनाला शेतकऱ्यांचा मोठा प्रतिसाद
3 अपंगांनाही आता ऑर्गनवादन सुलभ!
Just Now!
X