News Flash

कुख्यात गुंड श्याम दाभाडे आणि धनंजय शिंदे पोलीस चकमकीत ठार

चाकणजवळ झालेल्या चकमकीत श्याम दाभाडे ठार

यवतमाळमध्ये कीटकनाशक फवारणीमुळे मृत्यू होण्याचे लोण आता पश्चिम महाराष्ट्रातही आल्याचे दिसत आहे.

पुण्यातील कुख्यात गुंड श्याम दाभाडे हा मंगळवारी पोलिसांबरोबर झालेल्या चकमकीत ठार मारला गेला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, चाकण परिसरात ही चकमक झाली. यावेळी श्याम दाभाडेचा साथीदार धनंजय शिंदे हादेखील मारला गेल्याचे वृत्त आहे. गेल्या महिन्यात तळेगाव दाभाडेचे माजी नगराध्यक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे माजी शहराध्यक्ष सचिन शेळके यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन तसेच गोळ्या झाडून खून करण्यात आला होता. मोटारीतून निघालेल्या शेळके यांना खांडके पेट्रोल पंपानजीक अडवून हल्लेखोरांनी त्यांच्यावर तीक्ष्ण शस्त्राने वार करण्यात आले होते. ही हत्या श्याम दाभाडे याने केल्याचा पोलिसांनी संशय होता. त्यामुळे पोलीस श्यामचा कसून शोध घेत होते. पोलिस गेल्या अनेक दिवसांपासून दाभाडेच्या शोधात होते. चाकणमधील वरसाई देवी डोंगर परिसरात श्याम दाभाडे असल्याची माहिती ग्रामीण पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या एका पथकाने त्याचा पाठलाग केला. पोलिसांनी श्याम दाभाडे आणि त्याच्या साथीदाराला वेढा घातल्यानंतर शरण यायला सांगितले. यावेळी दाभाडेने पोलिसांवर ९ राऊंड फायर केले. त्यानंतर प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी पाच राऊंड फायर केले. त्यात गुंड श्याम दाभाडेसह त्याचा साथीदार धनंजय शिंदेही ठार झाला. श्याम दाभाडेकडे ४ पिस्तूल, एक कट्टा आणि ४२ राऊंड्स मिळाले.

पुणे परिसराच्या आर्थिक विकासानंतर निर्माण झालेल्या गुन्हेगारी क्षेत्रात श्याम दाभाडे याचा मोठा दबदबा होता. या भागातील जमीन खरेदी-विक्री व्यवहारात अडथळा आणणाऱ्यांचा काटा काढण्यासाठी संबंधितांकडून श्याम दाभाडे याचा वापर केला जात असे. तळेगावातील माहिती अधिकार कार्यकर्ते सतीश शेट्टी यांनी वडगाव मावळ तसेच लोणावळा भागातील बेकायदेशीर जमीन व्यवहारांचा पाठपुरावा केला. हा पाठपुरावा त्यांच्या जिवावर आला. त्यातून त्यांचा तळेगावात भरदिवसा निर्घृण खून झाला होता. रामीण पोलिसांनी या प्रकरणात तळेगावातील गुंड श्याम दाभाडे आणि त्याच्या साथीदारांना अटक केली होती. मात्र आरोप न्यायालयात टिकला नाही. श्याम दाभाडेला न्यायालयाने जामीन मंजूर केला. तेव्हापासून तो फरार झाला होता. त्यानेच तळेगावचे माजी नगराध्यक्ष बापू भेगडे यांच्या खुनाचा कट रचला होता. या प्रकरणात दाभाडेच्या साथीदारांना ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेने पकडले होते. दरम्यान, पोलिसांना गुंगारा देण्यात तरबेज असलेल्या दाभाडेने गेल्या आठवडय़ात तळेगावात भरदिवसा भाजपचे माजी नगराध्यक्ष सचिन शेळके यांचा खून केला होता. शेळके खूनप्रकरणात दाभाडेसह अकरा जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली. मात्र दाभाडे अद्याप पकडला गेला नव्हता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 29, 2016 10:30 am

Web Title: gangster shyam dabhade killed in police encounter in pune
Next Stories
1 आता महापालिका व जिल्हा परिषद  निवडणुकीतही भाजप पहिल्या स्थानावर
2 निश्चलनीकरणामुळे रोखीचे व्यवहार करण्याची नागरिकांची मानसिकता बदलेल – पीयूष गोयल
3 नितीशकुमार यांच्याशी नोटाबंदी निर्णयाच्या समर्थनाबाबत  मतभेद नाहीत – शरद यादव
Just Now!
X