28 February 2021

News Flash

‘स्वच्छ’ला महिन्याची मुदतवाढ

काम काढून घेण्याचा सर्वपक्षीय नगरसेवकांचा आग्रह कायम

काम काढून घेण्याचा सर्वपक्षीय नगरसेवकांचा आग्रह कायम

पुणे : घरोघरी जाऊन कचरा संकलन करण्यासाठीचे काम करण्यासाठी स्वच्छ सेवा सहकारी संस्थेचे काम काढून घेण्यात आल्यानंतर पर्यायी व्यवस्था होईपर्यंत स्वच्छ संस्थेला मुदतवाढ देण्याचा निर्णय स्थायी समितीने मंगळवारी एकमताने घेतला. त्यानुसार मार्च महिन्यापर्यंत शहरातील कचरा संकलनाचे काम स्वच्छ संस्थेकडून होणार आहे. दरम्यान, स्वच्छ संस्थेचे काम काढून घेण्याबाबत सर्वपक्षीय नगरसेवकांचा आग्रह कायम असून महिनाभरानंतर स्वच्छ बाबत काय निर्णय होणार हे स्पष्ट होईल.

स्वच्छ संस्थेचा करार संपुष्टात आल्यामुळे प्रारंभी तीन महिन्यांच्या कालावधीसाठी स्वच्छ संस्थेला मुदतवाढ देण्याबाबतचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाने स्थायी समितीला जानेवारी महिन्यात दिला होता. मात्र त्या वेळी के वळ पंधरा दिवसांसाठी स्वच्छ संस्थेने कचरा संकलनाचे काम करावे, असा निर्णय स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला होता. या कालावधीत निविदा प्रक्रिया पूर्ण होऊ न शकल्यामुळे आणि विरोध होत असल्यामुळे पुन्हा एक महिना कचरा संकलनाचे काम देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे ठेवण्यात आला. हा प्रस्ताव दाखलमान्य करण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली.

शहरातील घरोघरी निर्माण होणाऱ्या वर्गीकृत कचऱ्याचे संकलन करण्यासाठी स्वच्छ सेवा सहकारी संस्थेबरोबर महापालिके ने करार के ला आहे. पाच वर्षांसाठीचा झालेला हा करार ३१ डिसेंबर २०२० मध्ये संपुष्टात आला. रहिवासी, व्यापारी मिळकतींमधून आणि झोपडपट्टी विभागातून ओला आणि सुका कचरा वेगळा करून तो कचरा संकलित करण्याचे काम स्वच्छ संस्थेकडून के ले जात आहे. त्यापोटी निवासी आणि व्यापारी मिळकती आणि वस्तीमधील मिळकतींमधील नागरिकांकडून ठरावीक शुल्क वसूल करण्याचे अधिकार स्वच्छ संस्थेला देण्यात आले आहेत. मात्र त्याला सर्वपक्षीय नगरसेवकांचा विरोध आहे. नगरसेवकांच्या विरोधामुळे स्वच्छ संस्थेचे काम काढून घेण्याचा निर्णय महापालिका प्रशासनाने घेतला होता. त्याचे तीव्र पडसाद उमटले होते.

स्वच्छच्या कचरा सेवकांनी या खासगीकरणाला तीव्र विरोध केला होता. स्वच्छ संस्थेने कचरा संकलनाचे तयार केलेले प्रारूप नष्ट करण्याचा आणि खासगीकरण करण्यास सेवकांनी विरोध केला होता. दरम्यान, खासगी ठेकेदाराला कचरा संकलनाचे काम देण्याच्या हालचाली महापालिकेत सुरू झाल्या आहेत. त्यासाठी निविदा प्रक्रिया मागविण्यात येणार आहे. या निविदा प्रक्रियेत स्वच्छ संस्थेला सहभागी होता येणार असल्याचा दावा केला जात असला, तरी विशिष्ट संस्थेला हे काम देण्यात येणार असल्याची चर्चा आहे.

असंख्य तक्रारी

शहरातील साडेआठ लाख मिळकतींमधून दर महिन्याला स्वच्छ संस्थेला साडेचार ते पाच कोटी रुपये मिळतात. तसेच स्वच्छ संस्थेला पर्यवेक्षण शुल्क म्हणून महापालिके कडून दरवर्षी अडीच ते तीन कोटी रुपये दिले जातात. मात्र स्वच्छ संस्थेबाबत नागरिकांच्या असंख्य तक्रारी आहेत. कचरा संकलनाचे काम करताना स्वच्छ संस्थेकडून अटी-शर्तीचा भंग होत आहे, असे आरोप करत नगरसेवकांनी स्वच्छ संस्थेला मुदतवाढ देण्यास विरोध के ला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2021 12:35 am

Web Title: garbage collection in the pune city will be done by a swach zws 70
Next Stories
1 लोकजागर :  हळू बोला.. टेंडर उघडताहेत..
2 स्थायी समितीवर आठ नगरसेवकांची नियुक्ती
3 तांदूळ निर्यातीत भारत पहिला
Just Now!
X