शहरातील कचऱ्याचा प्रश्न चिघळलेला असताना कचऱ्याची विल्हेवाट 2Kachara1लावण्याच्या अनेक ‘अभिनव पद्धती’ समोर येत आहेत. कचरा साचला की तो पेटवला जात आहेच. त्याचबरोबर आता रस्त्यावरचा कचरा कडेला सरकवा आणि कडेचा कचरा नाल्यात किंवा रस्त्याच्या खालच्या बाजूला ढकला, असा मार्ग अवलंबला जात आहे. विशेषत: शहराच्या हद्दीलगत ही पद्धत अवलंबली जात असून, त्याचा परिणाम म्हणून सर्वत्र दरुगधी, घाणीचे साम्राज्य आणि अनारोग्याचा धोका निर्माण झाला आहे. ही पद्धती बदलली नाही तर दिवसेंदिवस धोका आणखीच वाढत आहे.
मध्य शहरापासून अंतरावर असलेल्या भागात आणि शहराच्या हद्दीलगत कचऱ्याच्या प्रश्नाची तीव्रता खूपच जास्त आहे. सिंहगड रस्त्यावर वडगाव, धायरी, वारजे, आंबेगाव, नऱ्हे, कात्रज, धनकवडी, कोंढवा, हडपसर अशा बहुतांश भागात हे चित्र पाहायला मिळत आहे. नागरिक रस्त्यावर किंवा रस्त्याच्या कडेला कचरा टाकत आहेत. त्यात ओला-सुका अशी विभागणी केलेली नसते. प्लास्टिकच्या पिशव्या, पोत्यांमध्ये बांधून कचरा टाकला जात आहे. त्यामुळे तो त्यातच कुजतो, सडतो आणि तेथेच साचून राहतो. त्याचे प्रमाण इतके जास्त आहे की, दिवसभरातच ढीग साचतात. हा कचरा रोज उचलला जात नाही. काही ठिकाणी तर तो कधीच उचलला जात नाही. तो रस्त्यावर ओसंडू लागला की, रस्त्यावरील कचरा रस्त्याच्या कडेला सारला जातो. आणि कडेचा कचरा रस्त्याच्या खाली ढकलला जातो. बाजूला नाला, ओढा, चर असेल तर कचरा त्यात टाकला जातो. तो तेथेच साचून राहतो. तेथेच तो कुजतो आणि परिसरात दरुगधी पसरते. अतिशय कुबट, सडलेल्या पदार्थाचा वास त्या भागातून जाणाऱ्या प्रवाशांनाही त्रासदायक ठरतो. तेथे राहणाऱ्यांसाठी तर तो कायमचा मनस्ताप ठरत आहे. अशी ठिकाणे जागोजागी आहेत. साताऱ्याकडे जाणाऱ्या बाहेरच्या महामार्गालगत नऱ्हे, वडगाव पुलाजवळ त्याची उदाहरण आहेत.
या कचऱ्यामुळे आरोग्याचे प्रश्न निर्माण झाले आहेत. या कचऱ्यावर वावरणारी भटकी कुत्री, डुकरे, वेगवेगळे पक्षी यांच्यामुळे परिसरात घाण आणि संसर्ग पसरत आहेच. त्याचबरोबर हा कचरा डासांसारखे कीटक, चिलटे, माशा यांच्या उत्पत्तीसाठी पूरक ठरला आहे. त्यामुळे या भागाला आरोग्याच्या अनेक समस्या भेडसावत आहेत. त्या भागातील नागरिकांनी याबाबत अनेक तक्रारी केल्या आहेत. मात्र, त्याची दखल घेतली जात नाही. चुकून कधीतरी कचरा उचलला जातो. बहुतांश वेळा तो इकडे तिकडे जमा केला जातो, अशी तक्रारी या भागातील नागरिकांनी बोलून दाखवल्या.

‘‘रस्त्याच्या कडेला जागोजागी कचरा साचलेला असतो. महामार्गाच्या दोन्ही बाजूला तर कचराच कचरा दिसतो. तो तेथेच सडत असल्याने या भागातून वाहनाने जातानासुद्धा दरुगधीचा सामना करावा लागतो. तेथून चालत जाणे तर मुश्कील होते. याबाबत कितीही तक्रारी केल्या तरी परस्थिती सुधारत नाही. गेल्या चार-पाच महिन्यांपासून अशीच घाण आहे. या कचऱ्यावर फिरणारे प्राणी आणि कीटक यांच्यामुळे रोग पसरण्याची भीती आहे. येथून जाताना-येताना लोक कचरा टाकतात. काहीजण तर मोटारींमधून येतात. कचरा भरलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या रस्त्याच्या कडेला टाकतात आणि निघून जातात. हे असेच सुरू राहिले तर पुढे काय होईल याची कल्पनासुद्धा करवत नाही. यंत्रणांना हात जोडून विनंती आहे, आतातरी इकडे लक्ष द्या.’’
– राजेश पवार, आंबेगाव

stealing liquor, liquor Kalyan,
कल्याण : महागड्या मद्याच्या बाटल्यांवर चोरट्यांचा डल्ला, माल चोरून ढाब्यांना विक्री
traffic police action against goon nilesh ghaiwal
गुंड नीलेश घायवळला वाहतूक शाखेचा दणका, मोटारींना काळ्या रंगाच्या काचांचा वापर केल्याप्रकरणी दंड
BJP Vijay Wadettiwar criticizes Ajit Pawar and Shinde group gadchiroli
अजित पवार व शिंदे गटाची अवस्था रस्त्यावरच्या भिकाऱ्यापेक्षाही वाईट; वडेट्टीवार म्हणाले, ‘भाजपचे गुलाम…’
When a leopard came in front of Karkare couple who were giving nature education to students
पाऊलखुणा दिसताच ‘ते’ थांबले; समोर गेल्यानंतर ‘तो’ पुढ्यात उभा ठाकला; निसर्ग शिक्षणाचे धडे देणाऱ्या दाम्पत्याला…