राज्याचे अन्न, नागरी पुरवठा मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांच्या शासकीय जपान दौऱ्यात शासकीय अधिकाऱ्यांशिवाय गौरव गिरीश बापट आणि आणि बापट यांच्यासाठी जनसंपर्क व प्रसिद्धीचे काम करणारे सुनील माने यांचा समावेश झाल्यामुळे हा चर्चेचा विषय झाला असून या दोघांना जपानच्या शासकीय दौऱ्यावर नेण्याचे कारण काय, असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. गौरव बापट आणि माने यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर या दौऱ्याची छायाचित्रे प्रसिद्ध केली आहेत.
पालकमंत्री बापट दहा दिवसांच्या जपान दौऱ्यावर गेले आहेत. त्यांच्यासमवेत पुण्याचे महापालिका आयुक्त कुणाल कुमार तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश झगडे हेही दौऱ्यात सहभागी झाले आहेत. त्या बरोबरच इतरही काही मंडळी मिळून दौऱ्यावर आठ ते दहाजण गेल्याचे सांगितले जात आहे. या दौऱ्यात बापट यांचे सुपुत्र गौरव बापट हेही सहभागी झाले असून बापट यांच्या जनसंपर्काचे व प्रसिद्धीचे काम पाहणारे कन्टेन्ट कन्सेप्ट कम्युनिकेशनचे सुनील माने हेही  बापट यांच्या समवेत आहेत. गौरव बापट आणि सुनील माने यांची या दौऱ्यातील नेमकी भूमिका काय, अशी विचारणा आता होत आहे. या दौऱ्यातील काही छायाचित्रे गौरव बापट आणि सुनील माने यांनी त्यांच्या फेसबुक पेजवर प्रसिद्ध केल्यामुळे या दोघांच्या दौऱ्यातील सहभागा विषयीची चर्चा जोरात होत आहे.
जपानमधील जायका या कंपनीने पुण्यातील नदीसुधारणा प्रकल्पाला एक हजार कोटी रुपयांचे कर्ज दिले असून केंद्राच्या माध्यमातून ते लवकरच पुणे महापालिकेला उपलब्ध होणार आहे. अल्प व्याजदराचे व दीर्घ मुदतीचे हे कर्ज असून अशाच प्रकारचे कर्ज पुण्यातील पाणीपुरवठा आणि अन्य प्रकल्पांसाठी जायका कंपनीकडून मिळणार आहे. त्यासंबंधीचे करार व चर्चा महापालिका आणि संबंधित कंपनीत या दौऱ्यात होणार आहेत. पुण्यात ७ जानेवारी रोजी सिरम इन्स्टिटय़ूटने महापालिकेला क्लिन सिटी प्रकल्पासाठी शंभर कोटी रुपये दिले. त्या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात आले होते. त्याचवेळी हा दौरा निश्चित झाला आणि दौऱ्याबाबत मुख्यमंत्र्यांबरोबर त्या वेळी चर्चाही झाली होती. त्यानंतर दौऱ्याची निश्चिती करण्यात आली.
पुणे शहरासंबंधी जपानमधील कंपन्यांबरोबर चर्चा व करार होणार असले, तरी या दौऱ्यापासून पुण्याचे महापौर, उपमहापौर या सर्वाना लांब ठेवण्यात आले आहे. तसेच महापालिकेतील कोणत्याही पदाधिकाऱ्यांनाही या दौऱ्याची कल्पना देण्यात आलेली नाही.

Action taken by Tihar administration after Delhi Chief Minister Arvind Kejriwal  blood sugar rises
केजरीवालांना इन्सुलिन; रक्तातील साखर वाढल्यानंतर तिहार प्रशासनाकडून कार्यवाही
Assured support for Arun Gawli daughter for mayor Controversy over Rahul Narvekar statement
अरुण गवळीच्या कन्येला महापौरपदासाठी पाठिंब्याचे आश्वासन; राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्याने वाद
eknath shinde
महायुतीच्या सर्व जागा बहुमताने निवडून येणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दावा, म्हणाले ‘शेतकऱ्यांना मदत…’
gulabrao patil
चावडी: बाळासाहेब भवन की ?