18 February 2019

News Flash

‘मेक इन इंडिया’ विषयावर गिरीश कुबेर यांचे आज व्याख्यान

‘व्हॉट इट टेक्स टू मेक इन इंडिया’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सामरिक शास्त्र विभागातर्फे (सेंटर फॉर अ‍ॅडव्हान्स्ड स्ट्रॅटेजिक स्टडीज) गुरुवारी (२६ मे) ‘प्रो. एस. व्ही. कोगेकर स्मृती व्याख्याना’चे आयोजन करण्यात आले आहे. ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांचे या वेळी व्याख्यान होणार असून, ‘व्हॉट इट टेक्स टू मेक इन इंडिया’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे.

बीएमसीसी रस्त्यावरील गोखले राज्य आणि अर्थशास्त्र संस्थेच्या सभागृहात हा कार्यक्रम गुरुवारी सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आला आहे. ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. विजय केळकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. संस्थेचे उपसंचालक एस. एच. महाजन यांनी ही माहिती दिली.

First Published on May 26, 2016 12:43 am

Web Title: girish kuber lecture on make in india