पुण्यातील कात्रज येथील राजीव गांधी राष्ट्रीय प्राणी संग्राहलयासमोर दुचाकीवरून जाणार्या तरुणीच्या गाडीला टेम्पोने दिलेल्या धडकेत तिचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ती तरुणी वैद्यकीय शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे.
एकता प्रभाकर कोठावदे ( वय २९ ) असे मृत तरुणीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एकता प्रभाकर कोठावदे ही तरुणी शनिवारवाडा या ठिकाणी असलेल्या घरातून दुपारच्या सुमारास दुचाकीवरून कात्रजच्या दिशेने निघाली होती. या तरुणीची गाडी राजीव गांधी प्राणी संग्रहालयासमोर आली तेव्हा एका टेम्पोने या तरुणीच्या गाडीला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की यामध्ये एकता खाली पडली आणि टेम्पोचे चाक तिच्या डोक्यावरुन गेले. या घटनेत तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस करत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 25, 2019 5:28 pm