News Flash

पुण्यात इंजिनीयरिंगच्या विद्यार्थिनीवर मित्रांकडूनच बलात्कार

पोलिसांकडून दोन्ही तरुणांना अटक, परिसरात खळबळ

पुण्यातील लोणीकंद परिसरातील एका इंजिनीयरिंग कॉलेजमधील विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. कॉलेजमधील दोन विद्यार्थ्यांनी बलात्कार केल्याची तक्रार या तरुणीने केली आहे. यानंतर या दोन्ही तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे.

लोणीकंदमधील इंजिनीयर कॉलेजमधील विद्यार्थ्याने प्रोजेक्टच्या आमिषाने तरुणीवर बलात्कार केला. या घटनेची माहिती या तरुणीने तिच्या एका मित्राला सांगितली. आपण या घटनेची तक्रार करु, असे म्हणत या तरुणीच्या मित्राने तिला भेटायला बोलावले आणि तिच्यावर बलात्कार केला.

दोन दिवसांमध्ये घडलेल्या या घटनांची तक्रार या विद्यार्थीनीने पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील दोन्ही विद्यार्थ्यांना अटक केली आहे. करण घुगे आणि महेश कोरडे अशी या विद्यार्थ्यांची नावे आहेत. मित्रांकडूनच करण्यात आलेल्या बलात्कारामुळे सध्या परिसरात खळबळ माजली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2016 5:33 pm

Web Title: girl raped by two friends in lonikand pune
Next Stories
1 Raosaheb Danve: शिवसेनेसोबत चर्चा करण्यासाठी आम्ही तयार- रावसाहेब दानवे
2 दिवाळीच्या तोंडावर एटीएम कार्ड ब्लॉक झाल्याने नागरिक हवालदिल
3 पिंपरीत महापौर विरूध्द राष्ट्रवादी
Just Now!
X