News Flash

लग्नास नकार दिल्याने प्रियकराच्या घरात गळफास घेऊन प्रेयसीची आत्महत्या

प्रियकाराच्या घरातच गळफास घेऊन प्रेयसीने आयुष्य संपवलं

प्रतिनिधिक छायाचित्र

पुण्यातील फुरसुंगी या ठिकाणी एका तरूणीने तिच्या प्रियकराच्या घरात गळफास घेऊ आत्महत्या केली. प्रियकाराने लग्नास नकार दिल्याने तिने तिचे आयुष्य संपवले. या प्रकरणाचा पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत. श्वेता अरूण बिश्वास असे आत्महत्या केलेल्या तरूणीचे नाव आहे. ती कॅम्प पुणे परिसरात वास्तव्य करत होती. सचिन कासिद (वय २९) हा पापडेवस्ती फुरसुंगी या ठिकाणी असलेल्या स्वप्नलोक सोसायटीत राहणारा तरूण तिचा प्रियकर आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फुरसुंगी येथील सोसायटीमध्ये श्वेता आणि सचिन मागील तीन वर्षांपासून शनिवार आणि रविवार या दोन दिवशी एकत्र रहात होते. त्यांच्यात प्रेमसंबंध होते, श्वेताने जेव्हा सचिनला लग्नाबद्दल विचारले तेव्हा सचिनने लग्नास नकार दिला. त्यानंतर सचिन त्याच्या कामावर निघून गेला. सचिनने नकार दिल्याने निराश झालेल्या श्वेताने त्याच्याच घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. सचिन जेव्हा कामावरून परतला त्यावेळी ही घटना उघडकीस आली. याप्रकरणी सचिन कासिद विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटकही करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरु असल्याचीही माहिती पोलिसांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2019 10:32 pm

Web Title: girlfriend commits suicide in her lovers house pune
Next Stories
1 पुणे – तृतीयपंथीय चांदणी गोरे यांची राष्ट्रवादीच्या महिला उपाध्यक्षपदी
2 पुणे – बहिणीला घरी आणण्यासाठी जाणाऱ्या भावाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू
3 उत्तरेकडील वाऱ्यांमुळे राज्यात पुन्हा गारवा
Just Now!
X