गोखले अर्थशास्त्र संस्थेतर्फे ‘विकासप्रक्रियेत संविधानात्मक आणि मानवी हक्क मूल्य’ या विषयावर शुक्रवारी (२३ ऑक्टोबर) न्या. झकेरिया याकुब यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
संस्थेच्या काळे सभागृहामध्ये दुपारी चार वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास न्या. पी. बी. सावंत आणि संस्थेचे संचालक प्रा. राजस परचुरे उपस्थित राहणार आहेत. हे व्याख्यान सर्वासाठी खुले आहे, अशी माहिती संयोजक प्रा. एच. एम. देसरडा यांनी दिली.
न्या. झकेरिया याकुब हे दक्षिण आफ्रिकेच्या संविधानिक न्यायालयाचे १९९८ ते २०१३ या कालावधीत न्यायाधीश होते. त्यापूर्वी त्यांनी रंगभेद-वंशभेदविरोधी लढय़ात सक्रिय वकील म्हणून २५ वर्षे काम केले. आफ्रिकन नॅशनल काँग्रेसच्या मानव हक्क आणि लोकशाही चळवळीत त्यांचा महत्त्वपूर्ण सहभाग होता. त्यांना दीड वर्षांच्या वयापासूनच अंधत्व आले.