25 February 2021

News Flash

पुण्यात सोन्याचा ‘नेकलेस कम मास्क’ बाजारात; साडेसहा लाखांच्या महागड्या मास्कची चर्चा

यापूर्वीही आलेत सोने-चांदी आणि हिरेजडित मास्क बाजारात

पुणे : रांका ज्वेलर्सने बनवलेला साडेसहा लाखांचा नेकलेस चोकर कम मास्क.

करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेसाठी मास्क हा सर्वांसाठी लाखमोलाचा ऐवज बनला आहे. त्यात आता सराफ व्यापाऱ्यांनी विविध डिझाइनचे सोन्या-चांदीचे आणि हिरेजडीत मास्कही बाजारात आणले आहेत. यात आणखी एका वैशिष्टपूर्ण सोन्याच्या मास्कची भर पडली आहे. या मास्कचे वैशिष्ट्य म्हणजे तो नेकलेस कम मास्क आहे. हा सर्वात महागडा मास्क असून त्याची किंमत तब्बल साडेसहा लाख रुपये आहे.

पुण्यातील रांका ज्वेलर्सने हा १२४.५ ग्रॅमचा मास्क बनवला असून त्याची किंमत ६ लाख ५० हजार रुपये आहे. या मास्कचे वैशिष्ट म्हणजे तो नेकलेस चोकर कम मास्क असा वापरता येतो. श्वास घेता यावा यासाठी हा सोन्याच्या तारांचा जाळीदार मास्क बनवण्यात आला आहे.

काही दिवसांपूर्वी चांदीचा करोना मास्क तयार केलेल्या रत्नागिरीतील एका व्यक्तीने ६० ग्रॅम चांदीचा एक मास्क तयार करून घेतला होता. त्याची किंमत ३ हजार ९०० रूपये इतकी होती. त्यानंतर पिंपरी-चिंचवड येथील एका व्यक्तीनं साडेपाच तोळ्यांचा सोन्याचा मास्क बनवून घेतला होता. त्यानंतर सूरतमधील एका हिरे व्यापाऱ्यानं हिरेजडित मास्क तयार केल्याचे समोर आले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2020 10:12 pm

Web Title: gold necklace cum mask in pune market discussion going on of expensive masks of rupees six and a half lakhs aau 85 svk 88
टॅग : Coronavirus
Next Stories
1 पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून लॉकडाउनची तयारी पूर्ण; नागरिकांना बाहेर न पडण्याचं आवाहन
2 भारतासोबत नेपाळने मैत्रीचे संबंध ठेवावे, पुण्यातील नेपाळी नागरिकांची मागणी
3 करोनाचा फटका : लोणावळ्यातील पर्यटनस्थळे ओस; व्यावसायिक आर्थिक संकटात
Just Now!
X