19 September 2018

News Flash

गोल्डन सीताफळांची फळबाजारात गोडी

पुरंदर तालुक्यातील माळशिरस, वडकी, दिवे, खेडशिवापूर भागातून गोल्डन सीताफळांची आवक सुरू झाली आहे

गोल्डन जातीच्या एका सीताफळाचे वजन १०० ते १४५ ग्रॅम आहे.

घाऊक बाजारात प्रतिकिलोस २५ ते ११० रुपये दर

पुणे : रंगाने पांढरी-पिवळसर आणि चवीला गोड असणाऱ्या गोल्डन जातीच्या सीताफळांची मार्केट यार्डातील फळबाजारात आवक सुरू झाली आहे. गोल्डन सीताफळे आकाराने मोठी असून गर जास्त प्रमाणात आहे. सीताफळांच्या अन्य जातींच्या तुलनेत गोल्डन सीताफळ टिकाऊ आहेत. घाऊक बाजारात गोल्डन सीताफळांना प्रतिकिलोस २५ ते ११० रुपये असा दर मिळाला आहे.

पुरंदर तालुक्यातील माळशिरस, वडकी, दिवे, खेडशिवापूर भागातून गोल्डन सीताफळांची आवक सुरू झाली आहे. सध्या २५ ते ३० कॅरेटमधून (प्लास्टिक जाळी) पाचशे ते सहाशे किलो गोल्डन सीताफळे बाजारात विक्रीसाठी पाठविण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.

गोल्डन जातीच्या एका सीताफळाचे वजन १०० ते १४५ ग्रॅम आहे. यंदा चांगला पाऊस झाल्याने गोल्डन सीताफळांची प्रतवारी चांगली आहे. सीताफळे आकाराने मोठी आहेत. सीताफळांचा हंगाम नोव्हेंबर महिन्यांपर्यंत सुरू राहतो. फळविक्रेते तसेच ज्यूस विक्रेत्यांकडून सीताफळांना चांगली मागणी आहे. येत्या आठवडाभरात गोल्डन सीताफळांची आवक आणखी वाढेल, अशी माहिती फळबाजारातील व्यापारी अरविंद मोरे यांनी दिली.

सीताफळ उत्पादक शेतकरी एकनाथ यादव म्हणाले, गेल्या काही वर्षांपासून आम्ही गोल्डन सीताफळांचे उत्पादन घेण्यास प्राधान्य दिले आहे. अन्य जातींच्या सीताफळांच्या तुलनेत गोल्डन जातीच्या सीताफळांना गर जास्त असतो.

HOT DEALS
  • Sony Xperia XA1 Dual 32 GB (White)
    ₹ 17895 MRP ₹ 20990 -15%
    ₹1790 Cashback
  • Apple iPhone 6 32 GB Space Grey
    ₹ 24990 MRP ₹ 30780 -19%
    ₹3750 Cashback

चवीला गोड असतात. त्यामुळे या सीताफळांना ग्राहक, फळविक्रेते आणि ज्यूस विक्रेत्यांकडून चांगली मागणी असते. गोल्डन सीताफळांच्या लागवडीतून उत्पन्न चांगले मिळते.

कमी पाण्यात जास्त उत्पन्न

पुरंदर तालुक्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. गोल्डन जातीच्या सीताफळांना कमी पाणी लागते. उत्पादन चांगले येते. सीताफळांचा एकरी खर्च पंधरा ते वीस हजार रुपये येतो. तर एकरी उत्पन्न चार ते साडेचार लाख रुपये मिळू शकते. गोल्डन सीताफळे नगदी फळ आहे. प्रत्येक झाडाला साधारणपणे दीडशे ते दोनशे फळे लगडतात. यंदा सुमारे सहाशे ते साडेसहाशे झाडांची लागवड करण्यात आल्याचे सीताफळ उत्पादक शेतकरी एकनाथ यादव यांनी सांगितले.

गोल्डन सीताफळांचे वैशिष्टय़

गोल्डन सीताफळ अन्य जातींच्या सीताफळांपेक्षा मोठे, दिसायला आकर्षक आणि चवीला गोड असते. गोल्डन सीताफळात बिया कमी असतात. झाडावरून या जातीचे सीताफळ पडले तरी त्याचे नुकसान होत नाही. फळ झाडावर पंधरा दिवस आणि काढणी केल्यानंतर साधारणपणे आठवडाभर टिकते. अन्य जातीच्या सीताफळात गर तीस ते पस्तीस टक्के असतो. गोल्डन सीताफळात गराचे प्रमाण पन्नास टक्के असते.

First Published on August 1, 2018 2:13 am

Web Title: golden custard apple at rs 25 to 110 per kg