गोष्टींमध्ये रमायला मुलांना जसे आवडते तसेच मोठय़ांनाही. हे लक्षात घेऊन मनशक्ती प्रयोगकेंद्र, लोणावळा तर्फे ‘गोष्टींमधल्या गोष्टी’ या अ‍ॅनिमेटेड डीव्हीडीची आणि ‘कृष्णरहस्य’ या ध्वनिपुस्तिके ची निर्मिती क रण्यात आली आहे. ‘गोष्टींमधल्या गोष्टी’ मध्ये आहेत पाच छोटय़ा छोटय़ा गोष्टी तर श्रीकृष्णलीला तसेच चार गूढ घटनांचा वेध घेणारी कृष्णरहस्य ही ध्वनिपुस्तिका.
‘गोष्टींमधल्या गोष्टी’ या मनोरंजनाबरोबरच बोधामृतही देणाऱ्या डीव्हीडीत खोडकर मुलापासून राजा, राक्षस, प्रधान, शेतकरी, सावकोर यांच्यापासून महात्मा जोतीबा फुले, सावित्रीबाई फुले आदी भेटतात. संस्कोर, नीती, चातुर्य, धैर्य देणाऱ्या रंजक व बोधकथा मुलांना तर आवडतातच, पण त्या मोठय़ांनाही अंतर्मुख व्हायला लावतात.
खोडय़ा कोढण्याबरोबरच वस्तूंची तोडफोड करणारा आणि पैसे झाडालाच लागतात अशा थाटात वावरणारा दिनू ‘मोलाचा रुपया’ या गोष्टीत भेटतो. त्याला पैशांची किंमतच नसते. पण त्याची ही खोड त्याचे वडील एको खेळाच्या माध्यमातून मोडतात आणि त्याला पैशाचे महत्त्व कळू लागते. छोटीशी ही कथा दिनूचे डोळे उघडण्यास मदत करतेच, पण बघणाऱ्याच्या मनावर देखील नक ळत क ष्टाचे महत्त्व कोरते.
‘जे होते ते चांगल्यासाठीच होते’ या शीर्षकोप्रमाणे मानणारा प्रधान आणि विक्र मगडच्या राजा यांच्या आयुष्यावर कोयकाय परिणाम होतात आणि त्यातून दोघांनाही कोय फोयदे होतात हे या गोष्टीतून उलगडते.
‘असामान्य धैर्य’ ही गोष्ट महात्मा जोतिबा फुले यांच्या आयुष्यात घडलेल्या सत्य घटनेवर आधारित आहे. ‘मोहाचे फळ’ या गोष्टीचे वैशिष्टय़ म्हणजे यातील लहान मुलाला त्याच्याच वयाच्या म्हणजे चार वर्षांच्या शर्व सोवनी या छोटय़ाशा बालकोने आवाज. मोहामुळे होणारी फसगत या गोष्टीतून
दिसते.
‘परोपकोराने यश’ ही गोष्ट नम्रता, धाडस, कष्टाळूपणा, इतरांना मदत क रण्याची वृत्ती, कृतज्ञता आणि चांगुलपणा इतक्या सगळ्या गुणांमुळे होणारा फोयदा गोष्टीतून दाखवून देते.
चुडामणी या राक्षसाच्या आवाजातून राहुल सोलापूरकर आपल्याला भेटतात. डीव्हीडी बघण्याचा बेचाळीस मिनिटांचा वेळ आणि दोनशे रुपये खर्च के ल्यानंतर आयुष्याला एक वेगळी आणि चांगली दिशा मिळू शकते. या डीव्हीडीसाठी अ‍ॅनिमेशन दिग्दर्शन अशोक नजणे यांचे आहे. या डीव्हीडीसाठी संगीताची तसेच पाश्र्वसंगीताची जबाबदारी पेलली आहे आशिष केसकर यांनी. हृषीके श रानडे याने शीर्षक गीत गायले असून कथा सादरीकरण भाग्यश्री केसकर, चंद्रशेखर रणभोर, आशिष पडवळ, संदीप पाटील, सौरभ निलेगावकर, मंथन महाडिक , आदिती केसकर, अजिंक्य कुलकर्णी, चिन्मय पटवर्धन, सोहम पणशीकर यांनी केले आहे.
‘कृष्णरहस्य’ हे स्वामी विज्ञानानंद यांच्या लेखणीतून निर्माण झालेले पुस्तक १९८० मध्ये प्रकोशित झाले. आता त्याची ध्वनिपुस्तिको रूपात निर्मिती झाली आहे. सुमारे आठ तासांची ही ध्वनिपुस्तिको दोन सीडींमध्ये सामावली आहे. या सीडींची सुरुवात प्रास्ताविकोने होते तर स्वामी स्वरू पानंद, सूरदास, विनोबा भावे, वल्लभाचार्य, स्वामी विज्ञानानंद, कबीर, महर्षी व्यास, संत एक नाथ, मीराबाई यांच्या पदांच्या सुरेल नादात कथा संपते. याशिवाय स्वामी विज्ञानानंद यांनी लिहिलेल्या पाळण्याचा आणि अंगाईगीताचाही समावेश या पुस्तिकेत आहे.
कृष्णाच्या जन्मापासून कंसवधापर्यंत कृष्णजीवनाचा पूर्वार्ध सांगणारी कादंबरी मुळातच उत्तम बांधणी केलेली असल्यामुळे वाचक त्यामध्ये गुंतत जातोच पण या ध्वनिपुस्तिकेच्या माध्यमातून होणारी वातावरणनिर्मिती ते कृष्णाच्या आयुष्यातील प्रसंग आपल्याच समोर घडत असल्याची भासमानता निर्माण करतात. या ध्वनिपुस्तिके तील विविध पात्रांचे वाचिक अभिनयानेयुक्त असे स्पष्ट शब्दोच्चार श्रोत्याला या ध्वनिपुस्तिकेकडे आकृष्ट करतात. डॉ. अमित त्रिभूवन यांची भारदस्तच नाही तर सुस्पष्ट आणि धीरगंभीर निवेदनशैली कोदंबरीतील शब्दांना अधिक सौंदर्य मिळवून देते.
पन्नास कलाकारांच्या एकत्रित सादरीकरणातून निर्माण झालेल्या या ध्वनिपुस्तिकेसाठी संदीप कुलकर्णी, डॉ. राजेंद्र दूरकर, प्रसाद गोंदकर, अभिषेक बोरकर, सारंग कुलकर्णी, ईशान देवस्थळी, अमेय पर्वते यांचा वाद्यवृंदामध्ये सहभाग आहे. दोनशेपन्नास रुपये मूल्य असणारी ही ध्वनिपुस्तिका शब्द, संगीतातून उलगडली जात असताना वैचारिक आणि सांगीतिक मेजवानी देते.
रवींद्र खरे, अन्वय बेंद्रे, चिन्मय पाटसकर, रुचा आपटे, अक्षया देवधर, मंथन महाडीक यांच्या माध्यमातून विविध पात्रे आपल्याला भेटतात. या पुस्तिकेचे दिग्दर्शन सिद्धेश पूरकर, निपुण धर्माधिकोरी यांचे असून पाश्र्वसंगीत नरेंद्र भिडे यांचे आहे. संगीताचा साज गंधारने चढविला असून ध्वनिसंयोजकोची कु शल कोमगिरी अक्षय वैद्य तर ध्वनिमुद्रणाची जबाबदारी हर्षवर्धन केतकर याने घेतली आहे.
डीव्हीडी आणि ध्वनिपुस्तिकेचे निर्मिती प्रमुख म्हणून प्रमोद शिंदे आहेत. डीव्हीडीचे लेखन, पटक था, दिग्दर्शन तर ध्वनिपुस्तिकेची संकल्पना आणि निर्मिती मयूर चंदने यांची असून निवेदन डॉ. अमित त्रिभूवन यांचे आहे. वाचण्याची आवड असणाऱ्या आणि नसणाऱ्या दोघांनाही ही  निपुस्तिका आपलीशी वाटेल यात शंका नाही.
shriram.oak@expressindia.com