पुणे : व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी मोठय़ा प्रमाणात वापरण्यात येत असलेले ‘झूम’ हे संके तस्थळ सुरक्षित नसल्याचे केंद्र सरकारने स्पष्ट के ल्यानंतर ‘डिजिटल इंडिया’अंतर्गत देशातच नवा पर्याय विकसित करण्याचा प्रयत्न सरकार स्तरावर सुरू करण्यात आला आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने देशभरातील तंत्रज्ञ, नवउद्यमी, माहिती तंत्रज्ञान कं पन्यांना ‘झूम’ या संके तस्थळाला पर्याय विकसित करण्याचे आव्हान दिले आहे. त्यासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली असून, विजेत्याला एक कोटींचे पारितोषिक दिले जाणार आहे.

करोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी लागू झाल्यानंतर देशभरातील नोकरदार घरी राहून काम करत आहेत. त्यासाठी विविध माध्यमांचा वापर के ला जात आहे. त्यात व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी झूम या संके तस्थळाचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. बहुतांश माहिती तंत्रज्ञान कं पन्यांकडून या संके तस्थळाचा वापर करण्यात येत आहे. मात्र, हे संके तस्थळ सुरक्षित नसल्याचे केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आले आहे. त्यामुळे देशातच या संके तस्थळाचा पर्याय तयार व्हावा या दृष्टीने इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने ‘इनोव्हेशन चॅलेंज’ सुरू के ले आहे.

‘जागतिक स्तरावर सॉफ्टवेअर विकसन, निर्मितीमध्ये भारताचे स्थान महत्त्वाचे असण्यासाठी नावीन्यपूर्ण आणि कार्यक्षम उत्पादनांची गरज आहे. त्यासाठी सॉफ्टवेअर उत्पादन २०१९ हे धोरण तयार करण्यात आले आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग उत्पादन विकसित करण्यासाठी घेण्यात येत असलेले इनोव्हेशन चॅलेंज हा त्याचाच एक भाग आहे. या उत्पादनामध्ये अमर्यादित शक्यता आहेत,’ असे मंत्रालयाने नमूद के ले आहे.

तीन टप्प्यात स्पर्धा; नोंदणीसाठी ३० एप्रिलची मुदत

व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी संके तस्थळ विकसित करण्याची स्पर्धा संकल्पना, प्रारूप आणि निर्मिती अशा तीन टप्प्यात होणार आहे. या स्पर्धेसाठीची नोंदणी सुरू झाली असून, त्यासाठी ३० एप्रिल ही अंतिम मुदत आहे. स्पर्धेची सविस्तर माहिती https://meity.gov.in या संके तस्थळावर देण्यात आली आहे.