होंडा सिटी कारच्या धडकेत आजी आणि नातवाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. खराडी भागात हा अपघात झाला, रेडिसन हॉटेलसमोर बुधवारी रात्री हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. शांताबाई साहेबराव सोनवणे (वय-६१) आणि नयन रमेश मोकळे (वय ११) या दोघांचा या घटनेत मृत्यू झाला. अपघातानंतर कारचालक फरार झाला आहे. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी होंडा सिटी कार क्रमांक एमएच १२ एलडी १०११ च्या चालकाविरोधात बेदरकारपणे गाडी चालवून अपघात घडवल्याचा आणि दोघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंदवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रात्रीच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर चंदनगर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातातील गंभीर जखमी शांताबाई सोनवणे व नयन मोकळे यांना नंतर उपचारासाठी कमांड हॉस्पिटल येथे हलविण्यात आले . मात्र उपचारादरम्यान मध्यरात्रीच्या सुमारास त्या दोघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले .याच अपघातात कराड येथील चाळीस वर्षीय इसम देखील जखमी झाला असुन त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत .

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Grandmother and her grandson died in accident in pune
First published on: 20-09-2018 at 10:56 IST