शिक्षक दिनाचे औचित्य साधून किर्लाेस्कर वसुंधरा इको रेंजर्स तर्फे ‘ग्रीन कॉलेज, क्लिन कॉलेज’ या योजनेचा शनिवारी प्रारंभ करण्यात आला. या वेळी किर्लाेस्कर उद्योगसमूहाचे संजय किर्लाेस्कर, निमंत्रक आरती किर्लाेस्कर, माधव चंद्रचूड, वीरेंद्र चित्राव, तसेच विविध महाविद्यालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा समावेश असणारा हा उपक्रम आहे. विद्यार्थ्यांच्या पर्यावरणविषयक जाणिवा प्रगल्भ व्हाव्यात व पर्यावरण रक्षणात त्यांचा कृतिशील सहभाग असावा या हेतूने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांंचा एक गट स्थापन करणे व त्यांच्यासाठी पर्यावरण, वन्यजीवन, ऊर्जा, हवा व पाणी यांना समर्पित असे कृती कार्यक्रम आखून त्यांची अंमलबजावणी करणे,असे या उपक्रमाचे स्वरूप आहे.
सध्या सुमारे ८०० महाविद्यालयीन विद्यार्थी या उपक्रमात सहभागी झाले आहेत. चित्रपट प्रदर्शन, चित्रपट महोत्सव, कार्यशाळा, चर्चासत्रे, व्याख्याने, निसर्ग सहली असे विविध कार्यक्रम या उपक्रमाच्या अंतर्गत घेतले जाणार आहेत. या उपक्रमास स्क्वेअर १, पगमार्क्स, सँचुरी एशिया, रेडिओ सिटी, इंद्रधनुष्य-पुणे महापालिका, सिम महाविद्यालय व यशदा या संस्थांचे सहकार्य आहे.