News Flash

सांस्कृतिक मेजवानीने गुढीपाडवा उत्साहात साजरा

सांस्कृतिक मेजवानीसह पारंपरिक उत्साहामध्ये गुढीपाडवा हा मराठी नववर्षांरंभदिन शनिवारी साजरा करण्यात आला.

| March 22, 2015 02:58 am

विविध कलाविष्कारांची जुगलबंदी आणि युवकांची काढलेली पुस्तक िदडी अशा सांस्कृतिक मेजवानीसह पारंपरिक उत्साहामध्ये गुढीपाडवा हा मराठी नववर्षांरंभदिन शनिवारी साजरा करण्यात आला.
पखवाज, तबला, सरोद या वाद्यांमधून निघालेले सूर, कॅनव्हासवर झालेली रंगांची उधळण, शिल्पकलेतून साकारलेला व्यंगचित्रकाराचा चेहरा, कथक आणि भरतनाटय़म नृत्यशैलीचे अनोखे सादरीकरण अशा विविध पारंपरिक कलाविष्कारांची अनोखी जुगलबंदी रसिकांनी शनिवारी अनुभवली. सेवा मित्र मंडळ आणि आर्टवाला फेस्टिव्हलतर्फे आयोजित ‘स्ट्रोक्स ऑफ ग्लोरी : जुगलबंदी ऑफ आर्ट्स’ या कार्यक्रमाचे उद्घाटन ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांच्या हस्ते झाले. अतिरिक्त पोलीस आयुक्त चंद्रशेखर दैठणकर, चित्रकार मुरली लाहोटी, मििलद मुळीक, अशोक गोडसे, इक्बाल दरबार, पं. शेखर बोरकर, संतोष उणेचा, डॉ. मििलद भोई, गिरीश चरवड, शिरीश मोहिते, संदीप भामकर या वेळी उपस्थित होते.
मैत्र-युवा फाउंडेशनतर्फे आयोजित पुस्तक िदडीमध्ये संतसाहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे, ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस, अभिनेते जयराम कुलकर्णी, लेखिका डॉ. वीणा देव, डॉ. नीलिमा गुंडी, पोलीस अधिकारी नीलम जाधव, स्मिता जाधव, सुधाकर तांबे, संकेत देशपांडे यांच्यासह सामाजिक संस्थांमधील वंचित मुलींचा सहभाग होता. यशवंतराव चव्हाण नाटय़गृहाजवळ भेलकेनगर येथे भरविण्यात आलेल्या पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन आमदार मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते झाले. २८ मार्चपर्यंत हे प्रदर्शन खुले राहणार आहे. शहर काँग्रेसतर्फे महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्या निवासस्थानी पुण्यविकास गुढी तर, काँग्रेस भवन येथे शहीद अशोक कामठे यांच्या स्मृती जागवित शौर्य गुढी उभारण्यात आली.
गुढीपाडवा या मराठी नववर्षांरंभदिनाचे औचित्य साधून नव्या वाहनांच्या खरेदी करण्यात आली. प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये ३७६ नव्या वाहनांची नोंदणी करण्यात आली. या माध्यमातून एक कोटी ४० लाख रुपयांचा महसूल कार्यालयाला मिळाला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2015 2:58 am

Web Title: gudi padwa celebration cultural feast
Next Stories
1 पाडव्याला तमाशा पंढरीत अडीच कोटीची उलाढाल
2 संविधान बचाव हेच चळवळींचे उद्दिष्ट असले पाहिजे
3 मोटारीने टेम्पोला धडक दिल्याने दोघांचा मृत्यू
Just Now!
X